मा. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या भ्रष्ट कारभारावीरोधात आवाज बुलंद करणार्या इंडियन बार असोसिएशन चे महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अॕड. विजय कुर्ले यांच्यावीरोधात मा. उच्च न्यायालयानेच दाखल केलेल्या न्यायालयीन अवमानप्रकरणी फौजदारी याचिकेवर आज सुनावणी होणार.

न्यायालयीन कार्यपद्धतीची नियमावली धाब्यावर बसवून फोर्टसारख्या विभागातील एका भाडेकरूला बाहेर काढण्यासाठी उच्च न्यायालयातील संबधीत न्यायाधीशाकडून विशेष प्राधान्य दिले जात होते. सदर भाडेकरूंनी ही बाब अॕड. विजय कुर्ले यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी भाडेकरूच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडताना मा. न्यायाधीशांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवून त्यांना अशा पद्धतीने न्यायालयीन कार्यपद्धतीची नियमावली पायदळी तुडवून न्यायदान येणार नाही असे भर न्यायालयात ठणकाऊन सांगत त्यावर ठाम आक्षेप घेण्याचं काम केलं होतं.

परंतू ॲड. कुर्ले यांच्या या भुमिकेने न्यायाधीशांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना या प्रकरणी पुढे जाणे कठीण होत असल्याने त्या न्यायाधीशांनी ॲड. कुर्ले यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करून त्यांना तुरूंगात टाकण्याची धमकी भर न्यायालयात दीली. ॲड. कुर्ले यांनीही न्यायाधीशांना ‘तुम्हाला माझ्यावीरोधात जे काही करणे उचित वाटते ते करावे, परंतू अशाप्रकारे देशाची घटना, कायदे, नियम वगैरे पायदळी तूडवून या पवित्र न्यायमंदिराला प्रदूषीत करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही व मी याच न्यायालयाचा वकील अधिकारी या नात्याने ते खपवून घेणार नाही’ असे ठणकावून सांगितले.

त्यानंतर न्यायाधीशांनी धमकावल्याप्रमाणे ॲड. विजय कुर्ले यांच्यावीरोधात जी फौजदारी अवमान याचीका दाखल केली गेली त्या याचिकेवर दिं. ०१/०८/२०१९ रोजी सुनावणी ठेवली होती. त्या दिवशी ॲड. विजय कुर्ले यांच्या वतीने सदर याचीका दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या चुकांवर आक्षेप घेऊन त्या सुधारण्यासाठी व मा. उच्च न्यायालयाची बाजू मांडण्यासाठी याचीकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली होती. याचीकेवर आज दि. ३०/०८/२०१९ ला सकाळी ११.३० वाजता मा. न्या. ए. ए. सय्यद व न्या. पि. डी. नाईक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

सदर याचिकेमध्ये ॲड. विजय कुर्ले यांची बाजू इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निलेश ओझा इतर २५ वाकिलांच्या मदतीने बाजू मांडत असून मा. उच्च न्यायालयाची बाजू महाराष्ट्राचे महाअधिवाक्ता (Advocate General) ॲड. आशुतोष कुंभकोणी बाजू मंडणार आहेत.

मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय येथील काही भ्रष्ट न्यायाधीशांच्या भ्रष्टाचारावीरोधात आवाज बुलंद करणे ॲड. कुर्ले यांना तेवढे सोपे गेलेले नाही. अशाप्रकारच्या भ्रष्ट न्यायालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात हितसंबंध गुंतलेल्या भ्रष्ट न्यायाधीशांनी काही दलाल वकिलांना हाताशी धरून ॲड. कुर्ले यांना न्यायालयीन अवमान प्रकरणी खोट्या फौजदारी याचीका दाखल करून त्यांचा आवाज दाबणाच्या प्रयत्न या मंडळींकडून होत असल्याचे ॲड. कुर्ले यांनी नमूद केले.

न्यायालयीन भ्रष्टाचारावीरोधातील आवाज बुलंद करीत असताना आजपर्यंत ॲड. विजय कुर्ले यांना विरोधात मा. सर्वोच्च न्यायालयातील एक, तर मा. मुंबई उच्च न्यायालयातील एकूण तीन फौजदारी याचीकांचा सामना करावा लागत आहे. परंतू ॲड. कुर्ले यांना भ्रष्टाचारावीरोधातील या लढाईला इंडियन बार असोसिएशनचे सर्व सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे हे ॲड. कुर्ले यांचे भ्रष्टाचारवीरोधातील चळवळीचे गुरू म्हणून मिळत असलेले सहकार्य व पाठींबा तसेच न्यायालयीन भ्रष्टाचार समूळ उखडून टाकण्यासाठी ॲड. कुर्ले यांचा चालू असलेला निःस्वार्थी व प्रामाणिक प्रयत्न यामूळे मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रामाणिक न्यायाधीश सदर अवमान याचिकांमध्ये सावध भुमिका घेत असल्याचेही बोलले जात आहे.

परंतू आजच्या या सुनावणीमध्ये मा. उच्च न्यायालयाच्या वतीने राज्याचे महाधिवाक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी ॲड. कुर्ले यांच्यावीरोधात काय भुमिका घेताता याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *