पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात खासदरांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील आणि परिसरातील सर्व खासदारांनी आपपल्या मतदार संघातील समस्या व मागण्या रेल्वे प्रशासना समोर मांडल्या. ह्या बैठकीच्या अनुषंगाने *डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने* परिसरातील सर्व *ZRUCC सदस्य* ह्यांच्या सह पालघर चे *माननिय खासदार श्री. राजेंद्र गावित* ह्यांज बरोबर बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली सर्व रेल्वे विषयक समस्यांबद्दल आणि मागण्यांबद्दल त्यांना माहिती देऊन त्यातील निवडक मागण्या प्रशासनापुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच प्रमाणे मुंबई रेल्वे कमिटी सदस्य *खासदार श्री राहुल शेवाळे* ह्यांनाही डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वे समस्या आणि मागण्यांबद्दल अवगत केले होते. ह्याच समस्या आणि मागण्या रेल्वे मुख्यालयात झालेल्या बैठकीत दोन्ही खासदारांनी प्रभावीपणे मांडल्या आणि सर्व मागण्यांचे निवेदन रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर केले. मतदार संघातील जवळ जवळ ७० टक्के नागरिक ह्या ना त्या करणाने रेल्वेवर अवलंबून असल्याने त्यांच्या समस्यांचे निराकारण होणे अतिशय महत्वाचे असल्याची भुमिका माननिय खासदार श्री राजेंद्र गावित ह्यांनी ह्या बैठकित मांडली. आपल्या मागण्या प्रभावी पणे सादर केल्या. खासदारांनी सादर केलेल्या मागण्यांचे स्वरुप पुढिल प्रमाणे होते.

*1.विरार लोकल मध्ये रुपांतरीत करण्यात आलेली ९३०२७ डहाणू लोकल पूर्ववत करणे.*
गेली कित्येक वर्षांपासून 93027 ह्या ईएमयू सर्व्हिस ने (दादर – डहाणू रोड) या विभागातील प्रवाशांसाठी सेवा पुरवली होती.पश्चिम रेल्वेने या सेवेचे नाव बदलून 90791 केले आणि डहाणू रोड ऐवजी विरार येथे खंडित केली.डहाणू रोड ते वैतरणा विभागातील प्रवाश्यांकडून या सेवेचे जुने वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी बराच दबाव आला आहे. पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने या मागणीचे समर्थन करणारे 900 हून अधिक स्वाक्षर्‍या असलेले पत्र दिले आहे. रेल्वेने या मागणीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कृपया ही सेवा दादर ते डहाणू अशी पूर्ववत करावी.

*2. वैतरणा स्थानकात 59441 / 42 ह्या गाडीला थांबा देण्यात यावा.*
59441 / 42 ही गाडी विरार ते डहाणू दरम्यान वैतरणा व्यतिरिक्त सर्व स्थानकात थांबते. विरार हुन रात्रौ 11 नंतरच्या सुमारास येणाऱ्या वैतरणा येथील प्रवाशांना काहीही पर्याय नाही. या प्रवाश्यांना विरार हुन पायी चालत येणे हाच पर्याय उरतो. अन्यथा पहाटे पर्यंत विरार स्थानकांत बसून राहावे लागते.

*3. विरारहून 12.45 वाजता अतिरिक्त ईएमयू.*
12.15 विरार – डहाणू ईएमयू आणि 13.20 विरार – डहाणू ईएमयू दरम्यान एक तास आणि पाच मिनिटांचे अंतर आहे. 13:20 ईएमयू वरील भार करण्यासाठी सुमारे 12:45 वाजता अतिरिक्त सेवा आवश्यक आहे.

*4. 17.20 वाजताच्या डहाणू – विरार ईएमयूचा अंधेरीपर्यंत विस्तार करण्यात यावा.*
17.20 वाजता ची डहाणू – विरार ईएमयू (93028) ही सेवा जर अंधेरी स्थानाकापर्यंत विस्तारित केली गेली तर यामुळे संध्याकाळच्या रहदारीच्या वेळेत थेट मुंबई पर्यंत जाता येईल. तसेच हीच ट्रेन अंधेरी हुन परतीचा प्रवास डहाणू पर्यंत डबल फास्ट प्रणाली प्रमाणे भाईंदर येथे थांबा न देता सुरू करावी. यामुळे रहदारीच्या वेळेत मुंबईत जायला व मुंबईहून यायला सोयीस्कर होईल. वलसाड फास्ट पॅसेंजर आणि लोकशक्ती एक्स्प्रेसमधील 1.5 तासाचे अंतर कमी होईल तसेच अनेक पास धारक प्रवाश्यांचा वेळ वाचेल.

*5. सकाळी 9.35 वाजताची ची डहाणू रोड – विरार ईएमयू बोरीवली पर्यंत विस्तार करण्यात यावी.*
डहाणू येथून अस्तित्त्वात असलेली सकाळी 9: 35 वाजताची ची ईएमयू (93010) ही सेवा सध्या विरार पर्यंतच आहे. ही सेवा बोरिवलीपर्यंत वाढविली जाऊ शकते आणि नंतर बोरिवली ते डहाणू रोड सर्व्हिसच्या रूपात परतीचा प्रवास करीत विरारपर्यंत दुपारी 12.45 वाजे पर्यंत विरार येथे पोहोचेल आणि डहाणू कडे जाईल, यामुळे 13:20 वाजताच्या विरार ते डहाणू रोड या विद्यमान सेवेवरील अतिरिक्त भार कमी होईल.

*6.पहाटे डहाणू रोड येथून अतिरिक्त सेवा आवश्यक आहे.*
पालघर हा जिल्हा झाल्यापासून व डहाणू रोड पर्यंत उपनगरीय सेवांचा विस्तार झाल्याने या उपनगरीय भगत झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी डहाणू हुन 3.55 वाजता मुंबई च्या दिशेने व 4.20 वाजता डहाणू च्या दिशेने जाण्यासाठी अतिरिक्त सेवा सुरू करणे नित्तांत गरजेचे आहे. ह्याचा फायदा मुंबई महानगर पालिका, इस्पितळ व रेल्वे प्रशासनाला अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या या उपनगरात राहणाऱ्या कामगारांना होऊ शकतो.

*7. सर्व शटल व पॅसेंजर गाड्यांना उमरोळी (UOI) या उपनगरीय स्थानकात थांबा देणे.*
उमरोळी हे पालघर व बोईसर या दरम्यानचे महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकाच्या काही अंतरावर नियोजित जिल्हापरिषद कार्यालय आहे तसेच दिवसेंदिवस येथील नवीन गृह संकुलांमुळे लोकवस्ती वाढून लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या ईएमयू सेवा अपुऱ्या आहेत म्हणून सर्व शटल व पॅसेंजर गाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी प्रवासी वर्गातून वाढली आहे.

*8. बोरिवली व दादर येथे 59024 या गाडीला वेळेवर पोहोचवणे.*
59024 वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर ही एक महत्वाची प्रवासी सेवा आहे आणि ती बोरिवली व दादर येथे वेळेवर पोहोचवण्याची तसदी घ्यावी.

*9. सकाळी व संध्याकाळी रहदारीच्या वेळेत इएमयु सेवा लूप लाइनवर घेणे टाळावे.*
सकाळी व संध्याकाळी रहदारीच्या वेळेत डहाणू रोड येथून सुरू होणाऱ्या ईएमयू सेवांना कमी प्राधान्य देऊन त्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांसाठी काही मिनिटे लूप लाइनवर अडकतात. या मुळे रेल्वे प्रशासन स्वतःचा खर्च न वाढवता दैनंदिन प्रवासी सेवांना उच्च प्राथमिकता देण्यात यावी.
*10. महाराष्ट्र संपर्क क्रांती (12907) ह्या गाडीला पालघर येथे थांबा देणे.*
महाराष्ट्र संपर्क क्रांती हि गाडी केळवे रोड येथे राजधानी साठी १३-१८ मिनिटे लूप ला (सायडिंगला) असते तर ती सहज पालघरला लूप घेऊन हाॅल्ट पण देता येऊ शकते. महाराष्ट्र संपर्क क्रांती असे नाव असूनही ह्या गाडीला महाराष्ट्रात एकाच थांबा आहे. पालघर च्या थांब्यामुळे पालघर स्थानकाचे उत्पन्नही वाढेल. पालघर हे आत्ता जिल्ह्याचे ठिकाण असल्याने नक्कीच ह्या गाडीला थांबा देणे प्रार्थनिय आहे.

*11. पालघर येथे इएमयु चे कार शेडचे नियोजन करणे.*
पालघर येथे रेल्वे प्रशासनाची बरीच जागा उपलब्ध आहे त्याअनुषंगाने येथे इएमयु चे कार शेडचे नियोजन करावी ही विनंती. सकाळ संध्याकाळी रहदारीच्या वेळेत या करशेड मधूनच इएमयु ची सेवा वाढवू शकतो.

*12. जी आर पी, आर पी एफ यांचे वसई रोड येथील कार्यालय स्टेशन परिसरात करण्याबाबत.*
वसई रोड हे पश्चिम रेल्वे वरील अतिशय महत्वाचे जंक्शन आहे, येथे लांब पल्याच्या व मालगाड्या (गुड्स कॉरिडॉर) भरपूर प्रमाणात थांबतात. यामुळे सुरक्ष रक्षकांवरही जास्त जवाबदारी आहे. विरार ते वसई दरम्यान रेल्वे सुरक्षा बल चे ऑफिस स्टेशन परिसरात बांधावे जेणे करून प्रवासी व सुरक्षाबल यांचे नुकसान होणार नाही. सध्याचे वसई रोड येथील रेल्वे पोलीस स्टेशन हे स्थानकापासून पश्चिमेला एक किलोमीटर दूर आहे त्यामुळे बरेच प्रवासी तक्रार करण्यासाठी तयार होत नाहीत आणि येथे जाण्यासाठी कोणी रिक्षाही उपलब्ध नसतात आणि असले तरी ते सामान्य प्रवाशांसाठी परवडण्यासारखे नसते. ह्याचा त्रास प्रवाश्यांना तर होतोच पण सुरक्षा रक्षकांना ही होतो.

*13. घोलवड स्थानकात 19023/24 फिरोजपुर जनता एक्सप्रेस ला थांबा देण्याबाबत.*
घोलवड येथे बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांचे शाळा व महाविद्यालये आहेत. येथे पालघर, बोईसर परिसरातील भरपूर विद्यार्थी व शिक्षक दैनंदिन प्रवास करीत असतात. या स्थानकात खूपच कमी गाड्या थांबतात.फिरोजपुर जनता एक्सप्रेस ला येथे थांबा दिला तर या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा बराच वेळ वाचेल.
ह्या मागण्यां व्यतिरिक्त आपल्या परिसरातील जे रुग्ण मुंबईतील रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया किंवा तत्सम असाध्य शस्त्रक्रियेसाठी उपचार घेत आहेत ते शस्त्रक्रिये नंतर उपचारासाठी जाताना तसेच ज्या रुग्णांना अशा शस्त्रक्रिये नंतर कायम पेसमेकर चा आधार घ्यावा लागतो अशा रुग्णांना उपनगरीय गाड्यांचा वापर करताना जनरल डब्यात प्रवास करणे शक्य नसते अशा रुग्णांना योग्यत्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह अपंगांसाठी राखिव असलेल्या डब्यात प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि घोलवड ते सफाळे ह्या स्थानकांवर शक्य असलेल्या लांबा पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा आणि ह्या स्थानकांवरील प्रवाशांना आपपल्या स्थानकांवरुनच लांबपल्ल्याचा प्रवास करता यावा अशा आशयाचे पत्र संस्थेच्या विनंतीला मान देऊन माननिय *अवजड उद्योग मंत्री श्री. अरविंद सावंत* ह्यांनी रेल्वे प्रशासनाला लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *