

प्रतिनिधी : दि. ८ सप्टेंबर २०१९ रोजी कळब-राजोडी येथील आरोग्य माता वेलंकनी यांचा सन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अती उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा राजोडी दर्या किनारा सेवा संघाच्या अध्यक्षा सौ. शैली फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली राजोडी चार रस्ता, पारधी पाडा येथे कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात कळब, राजोडी, वसई कोळीवाडा पाचुबंदर, मुबंई अशा अनेक ठिकाणाहून लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे ८ सप्टेंबर हा दिवस मावली चा जन्म दिवस आणि याच दिवशी सौ. शैली फर्नांडिस यांचा सुध्दा वाढदिवस असतो त्या अनूषंगाने कार्यक्रम अति उत्साहाने साजरा केला जातो. सदर कार्यक्रमात राजोडी, कळब, गावातील स्थानिक नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्याच प्रमाणे सत्पाळा ग्रामपंचायत चे सरपंच जेम्स कोरिया व त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. त्याच प्रमाणे वेलंकनी माता राजोडी दर्या किनारा सेवा संघाचे पदाधिकारी सेक्रेटरी : रेश्मा महाडेश्वर, खजिनदार : टेल्मा फोन्सेका व सदस्य : एस.पी.कार्डोज, मारीया गोम्स, मेरी फोन्सेका, अध्यक्षा : शैली फर्नांडीस उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवर व नागरीकाचे आभार सौ. शैली फर्नांडीस यांनी मानले.