वसईकरांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक आश्वासन राजकीय पक्षांकडून मिळून सुद्धा एसटी, गावे वगळणे, पिण्याचे पाणी चे प्रश्न जसेच्या तसे आहेत, त्यातच वसई पोलिसांनी , जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या श्री मिलिंद खानोलकर (मी वसईकर अभियान), डॉमणिका डाबरे (जन आंदोलन), शम्स पठाण,किरण शिंदे (काँग्रेस), ब्रिजेश कुमार (भाजप), जॉर्ज फरगोस (वकील), अनिल चव्हाण (वकील) व इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून वसईत कायदा व लोकशाहीची हत्या केली आहे.

पोलिसांच्या मनमानी कारभारा विरुद्ध नागरिकांचे प्रश्न मंडण्या करीता अधिकाऱ्यांची वेळ घेतली. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या सांगण्यावरून अन्य अधिकारींशी चर्चा झाली. त्यानी तीन चार दिवसांनी सर्व मुद्द्यावर चर्चा करूया सांगून तीन ते चार दिवसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल गेले. हे एकच प्रकरण नाही तर भाजप चे नालासोपारा कार्यकर्ते ब्रिजेश कुमार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर ही अश्याच प्रकारचे खोटे गुन्हे नालासोपारा पोलिसांनी दाखल केले आहेत. हे सर्व पक्षीय व संघटणीय कार्यकर्ते आहेत

पालघर एसपी लोकप्रतिनिधी खासदार व राज्यमंत्री ह्यांचे कॉल्स घेत नाहीत, त्यांच्या विनंतीस मान देत नाहीत. कार्यकर्त्यांच्या जनतेशी संवाद साधत नाहीत, असा मनमानी कारभार चालला आहे, असे प्रथमच घडत आहे. वसई मध्ये कायदा व लोकशाही धोक्यात आली आहे.या बाबत सर्व राजकीय पक्ष व नेते कसली वाट पाहत आहेत ?

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का बहिष्कार घालू नये? व कार्यकर्त्यांवर पोलिसांन मार्फत होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांचा निषेध का करू नये? हा विचार अनेक वसईकरामध्ये घुटमळत आहे, त्याचा स्फोट कधी होईल सांगता येत नाही असे मिलिंद खानोलकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *