

” विधानसभा बाजार “
भरला विधानसभा निवडणुक
नावाचा नवा बाजार .
भगव्यासह कमळाबाई नावाचा
पसरला साथीचा आजार .
कावळ्यांनी झाडांची अदला
बदली केली .
सापा सारखी कावळ्यांनी जणु
कात टाकली .
पक्षांतराच्या नावावर स्वत:ची
भाजताय पोळी .
मावळत्या सुर्याला पाठ फिरवणे
आहे जुनी खेळी .
शरद पवारांच्या पक्षाची स्थिती
पाहुन महाराष्ट्र हळहळला .
मनसेनी 26 जागा लढवण्याचा
निश्चय केला .
जुने मोठे नाग/ साप कात टाकुन
अजगरांचा पोटात शिरले .
पट्टीच्या पोहणाऱ्यांनीही टायटॅनिकला
राम राम ठोकले .
भाजप-शिवसेनेची युती येत्या
निवडणुकीतही कायम .
लक्षवेधी ठरणार युतीच्या जागा
वाटपांचे नियम .
========================