

मुंबई (प्रतिनिधी)
अनेक चांगली लोकं शिवसेनेत येतायत. नालासोपारा साठि आमच्या कडे चांगला उमेदवार आहे. ते नवीन काही घडवू पाहत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो, अशा शब्दांत सुपरकॉप प्रदीप शर्मा यांचे शुक्रवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले.
आपल्या कारकीर्दीत गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या या धडाडीच्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवबंधन बांधत सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. शर्मा शिवसेनेत प्रवेश करत असल्याची बातमी पसरल्यामुळे मातोश्रीचा संपूर्ण परिसर दुपारपासूनच शर्मा यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
शिवसेनेतील प्रवेशानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींचा या सुपरकॉपला गराडा पडला. त्यावेळी शर्मा म्हणाले की, वर्दीत असतानाही जनसेवेचे कंकण हाती बांधले होतेच, आताही तोच वसा पुढे चालवणार आहे.
स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर झाल्यावर शर्मा यांच्या राजकारणातील सेकंड इनिंगविषयी सर्व स्तरांत उत्सुकता होती. शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी या चर्चेला विराम दिला आहे. शर्मा नालासोपारा येथून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरतील आणि बहुजन विकास आघाडीच्या साम्राज्याला आव्हान देतील, याला उद्धव यांनी अाप्रत्यक्ष दुजोरा दिल्यामुळे महाराष्ट्रातील एक बिग फाईट आता सुरू झाली आहे.
लाखो शिवसैनिकांच्या फोर्समध्ये आज मीही सामील झालोय. याचा मला अभिमान
आहे. जनसेवेसाठीच मी शिवसेनेत आलो आहे, असे ते म्हणाले.