

पालघर दि. १४ सप्टेंबर, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो. त्यांच्याकडून आपल्याला जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टि मिळत असते. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ,विधिज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ह्याच गोष्टीची जाण ठेऊन सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जयंतीचे म्हणजे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपल्या गुरुजनांचा सन्मान केला. ह्या प्रसंगी विचार व्यक्त करताना आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच पालघर सारख्या ठिकाणी उच्चप्रती चे विधी विषयक शिक्षण उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले. भारतासारख्या लोकशाही देशात समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था समृद्ध असण्याचे प्रमुख कारण म्हणजे “विधी शिक्षणाचा” भक्कम पाया. आणि हाच पाया आणखी मजबूत करण्याचे काम पालघर येथिल गुरुजन करित आहेत अशी भावना ह्यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ.पायल चोलेरा, प्रो.दिशा तिवारी,प्रो.उत्कर्षा जुन्नारकर,प्रो.राधा मित्रा,प्रो. विनोद गुप्ता,प्रो. प्रिया तांडेल व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.