

वसई,: मुसळधार पावसात विद्यूत वाहक तारेच्या संपर्कात आल्याने एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना रविवारी सकाळी घडली आहे.
वसई पश्चिम येथील मुळगांव शांता हाऊस,डिकोन्हा चाळ येथे राहणारी जोत्स्ना आल्पेश परमार (वय 28) हि महिला रविवारी सकाळी घराजवळील गीरणीत जाण्यास निघाली होती.मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.तेथे महावितरणाची भूमीगत विद्यूत केबल तुटल्यामुळे त्या पाण्यात विद्यूत प्रवाह उतरला होत्या.त्या पाण्यातून जोत्स्ना परमार जात असताना त्यांना जोराचा झटका बसला व त्यांचा मृत्यू झाला.याबाबत वसई पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत जोत्स्ना परमार या पती व दोन लहान मूलींसोबत मुळगांव येथे राहत होती.शवविश्चेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.त्यानंतर अंतसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह राजस्थान येथे नेण्यात आला आहे.