प्रतिनिधी,
दिनाक.19 सप्टेंबर २०१९ रोजी केळवे समुद्र किनारी पर्यावरण पूरक धुप प्रतिबंधक बंधारा याचे भूमिपूजन पालघर चे खासदार श्री.राजेंद्र गवित साहेब यांच्या हस्ते पार पडले.
भारतातील पहिला पर्यावरण पूरक धुप प्रतिबंधक बंधार्याचा “पायलट प्रोजेक्ट” केळवे समुद्र किनारी साकारला जाणार आहे.
यासाठी जीओ सिंथेटिक फायबर व समुद्री वाळूचा वापर केला जाणार आहे.या अभिनव प्रयोगाव्दारे पर्यावरणाचे संतुलन राखुन किना र्याची होणारी धुप कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.अशी माहिती यावेळी पतन. अधिकाऱ्यांनी दिली.
सदर कामासाठी पतन अभियांत्रिकी विभागाच्या १३व्या वित्ताआयोगाच्या निधीमधून दोन कोटी बारा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमास
शिवसेना जिल्हा प्रमुख (पालघर) श्री.राजेश भाई शहा. शिवसेना पालघर लोकसभा सहसंघटक केदार काळे, केळवे शाखाप्रमुख श्री.तुषार पाटील.
केळवे सरपंच सौ.भावना सं.किणी,उपसरपंच श्री.सदानंद राऊत.
माजी सरपंच-भारती सावे,
माजी उपसरपंच- प्रमोद पाटील, सुनिल राऊत,
केळवे ग्रामपंचायत सदस्य – नितीन राऊत,सुपर्णा पाटील, संतोष भुरकूड,प्रियांका पाटील,ममता किणी,दुर्वेश पाटील,
हाॅटेल असोसिएशन केळवे अध्यक्ष श्री.आशिष पाटील, सचिव- संजय घरत,सदस्य-कुंदन पाटील.त्याचप्रमाणे
शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.जयदिप पाटील,श्री.समित म्हात्रे.
केळवे महिला शाखाप्रमुख सौ. हेमाली पाटील, शाखा संघटक सौ.विलासीनी बारी,
युवासेना जिल्हा पदाधिकारी वैभव पाटील व युवासैनिक केळवे,पतन अभियंता श्री.कल्पेश सावंत आदी मान्यवर व केळवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारकडून केळवे पर्यटन स्थळास मान्यता व निधीची तरतूद याबाबत मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केलेला होता.तसेच राज्यशासनामार्फत केंद्र सरकारला सदर प्रस्ताव सादर करणे साठी मी जातीने पाठपुरावा करणार आहे.असे यावेळी खासदार श्री राजेंद्र गावीत यांनी या प्रसंगी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *