

पालघर, केळवे, आज दि 19 सप्टेंबर 2019
स्थळ – यशदीप बंगला केळवे याच्या शेजारी पत्राशेड, शिवसेना विद्यमान नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे रा वेऊर हे संदीप सावे रा. केळवे आणि अशोक अंबुरे रा. लोकमान्य नगर पालघर व दिलीप पाटील उमरोली यांच्या सोबत तीनपट्टी जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पालघर यांनी रंगे हात पकडले. व यांच्या कडून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हि कारवाई संद्याकाळी साडेपाच वाजता केली. यात हे आरोपी रंगे हात जुगार खेळताना पकडले गेले. यातीळ आरोपी रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे हा पालघर नवली येथील मटका किंग म्हणून प्रसिद्ध आहे. पण विद्यमान नगरसेवक झाल्या नंतर हे धंदे बंद केले म्हणून घोषित केले होते.असे असताना या वर कारवाई होऊन यांचे नगरसेवक पद रद्द झाले पाहिजे. नाहीतर नगर पालिका यांचा जुगाराचा हद्दा बनेल. या कारवाई साठी पालघर नागरिक च्या सर्व टीम तर्फे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी जितेंद्र वणकोटी व त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन… !
या नगरसेवकांना व इतर आरोपीना रात्री उशिरा साडे नऊ वाजता जामीन होऊन सोडण्यात आले आहे. तरी रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे वर सक्त कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. जेणे करून मतदारांनी यांना सेवा करण्यासाठी निवडून दिलेले आहे नाही की नगरपालिका जुगाराचा हद्दा करण्यासाठी… ?