वसई : बहुजन महापार्टी”कडून वसई मधून ऍड. सदाशिव हटकर तर नालासोपारामधून मजहर पठाण तसेच बोईसरमधून सुनील धानवा व पालघरमधून राजू लडे असे चार उमेदवार विधानसभेसाठी रिंगणात उतरवले असणार असल्याची माहिती बहुजन महापार्टीच्या प्रदेश कार्यालयातून जाहीर झालेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे यावेळी मागील लोकसभेप्रमाणे पालघर जिल्ह्यात बहुजन महापार्टी आपला काय जलवा दाखवते असे बोलले जात आहे.
अतिशय अल्प काळात प्रसिद्धी जोकत आलेला पक्ष म्हणून “बहुजन महापार्टी” या पक्षाची ओळख बनली आहे. मागील लोकसभा निवडणुकी दरम्यान या पक्षाकडे वसई तालुक्यात एक हाती सत्ता असलेला स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीची निशाणी घेतल्याने पालघर जिल्ह्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले होते. लोकसभा निवडणूक दरम्यान या पक्षाने शिवसेना-भाजपाच्या उमेदवाराला पडद्या आड पाठिंबा दिला होता. अशी चर्चा ही त्यावेळी वसई तालुक्यात झाली होती. आज हा पक्ष आपली ताकद आजमवण्यासाठी आपले उमेदवार उभे करीत आहे असे बोलेल जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *