

वसई. ( विशेष प्रतिनिधी ) – मुंबई, पुणे, बेंगळूरु या शहरानंतर आता पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातही इंटरनेटचे जाळे पसरणार असून त्यासाठी सिटाडेल या फायबर ऑप्टिक कंपनीने पुढाकार घेतला आहे. सिटाडेल ने आपले उत्पादन आणि आणि पायाभूत सुविधा वसई जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून त्यासाठी आपले नवीन केंद्र वसई येथे स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न ग्रामीण भागातही साकारणार असल्याचे मत सीआयएसचे व्यवस्थापकीय संचालक के. के. शेट्टी यांनी व्यक्त केले. यावेळी सिटाडेल उपाध्यक्ष अभिनंदन शर्मा उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना शेट्टी यांनी सांगितले की, याबाबत बोलताना म्हणाले, “ भौगोलिक लाभ आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे आम्ही भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची ऑप्टिकल फायबरची वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंजिनीअरिंग सेंटर भारत आणि उर्वरित जगातील टेलिकॉम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी आवश्यक उत्पादनांचा आराखडा तयार करण्यावर भर देणार आहे. वसई येथील हे केंद्र टेलिकॉम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला जोडण्यावर भर देणार आहे. उत्तम उत्पादन सुविधा असलेल्या याठिकाणी सुरुवातीला 40-50 रोजगार निर्माण होणार आहेत. नवीन उत्पादन केंद्र आणि इंजीनिअरिंग सेंटरच्या मदतीने भविष्यात वसई जिल्ह्यात डिजिटल क्रांती करण्याचा मानस असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले