वसई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बविआच्या पदाधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांना भेटून मदत देण्यात आली. याचा भारतीय जनता पार्टीचे वसई रोडमंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी खरपुस समाचार घेतला आहे.
यावेळी त्यांनी बोलताना, पुरग्रस्तांच्या टाळूवरचे लोणी खाणारा बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे. सांगली-कोल्हापूरला पूर येऊन अंदाजे आज एक महिना उलटला असताना एवढे दिवस बहुजन विकास आघाडी व त्यांचे स्वयंमघोषीत लोकनेते झोपले होते का? असा सवाल उत्तम कुमार यांनी बविआ ला केला आहे.
तसेच येणार्‍या विधानसभा निवडणूकीमध्ये बविआच्या वसई, विरार व बोईसर विधानसभा हरणार ह्याची जाणिव झाल्याने त्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने फडणवीस सरकारकडून वसई तालुक्यातील 4215 पुरग्रस्त परिवारांना आता पर्यंत 6 कोटी 8 लाख 68 हजार 100 रुपये एवढी मदतीची रक्कम सुर्पुतही करण्यात आली आहे. याचे श्रेयही लाटण्याचा बविआचा प्रयत्त्न होता. बविआ व त्यांच्या उरलेल्या फक्त दोन्ही आमदारांना वसईच्या जनतेशी काही देणं-घेणं असे ही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बविआ या गुंडप्रवृत्तीला चालना देणार्‍या पक्षाने फक्त आणि फक्त येणारी विधानसभा निवडणूक पाहुन राजकीय पोळी भाजण्यासाठी दिलेली मदत त्यांना परत द्यावी अशी विनंती वसई रोड मंडळाकडून आम्ही आपणास करतो असे उत्तम कुमार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *