

महिलांचा सन्मान ही शिवरायांची आणि शिवसेनाप्रमुखांची शिकवण माझ्या रक्तात भिनली आहे. महिला आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा मोठा आधार असतात. शिवसेनेच्या याच दृष्टीकोनाला अनुसरून पीएस फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही याचसाठी महिला सक्षमीकरणाचे अनेक उपक्रम चालवले आहेत. नालासोपारातील महिलांचे भविष्यही शिवसेना प्रथम ती संमेलनाद्वारे बदलणार आहे, असे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी नालासोपारा येथे सांगितले.
राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शिवसेनेच्या ‘प्रथम ती’ या महिला संमेलनातील तिसऱ्या टप्प्यात महिला शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य (आरोग्य), स्वावलंबन या पाच विषयांवर झालेल्या चर्चेत शर्मा सहभागी झाले होते.
ज्योतीताई ठाकरे, दिपा पाटील, शितल देवरुखकर आणि भारती ताईगावकर यांच्या उपस्थितीत हे महिला संमेलन झाले.