स्नेहा जावळे यांचे वृत्त काव्य

” ईडी चौकशी की राजकारण “
यावेळी ईडीच अस म्हणजे झालय
टांगा पलटी घोडे फरार .
सरकारच्या शरद पवारांवर गुन्हा
दाखल मुळे जनतेच्या मनात दरार .
बहुदा वाटल असेल ईडीमुळे पवार
कदाचीत खचतील ?.
उलट पवारजींच वादळ जोर घेतय
स्वत:च्या डावात विरोधी फसतील.
तूर्तास या चौकशीची गरज नाही
ईडी कडुन पवारांना मेल आला .
राष्ट्रवादीचा कार्यकरता पेटुन
उठला रस्ता ,नाका जाम झाला.
पवारांनी ठरवल ईडी कार्यालयात
जाऊन स्वत: घेणार आहेत भेट .
ईडी कार्यालयाच्या आसपास कलम
१४४ लावले संबधितांनी थेट .
काय होणार पवारजी पोहचल्यावर
देशाचे लक्ष लागले .
80 वर्षाचे तरुण भारी पडले असे
सामान्य लोकही बोलले .

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *