होय,गेल्या २० वर्षात वसई,नालासोपारा विरार,नवघर-माणिकपूर शहरासह ग्रामीण भागाचा आम्ही विकास केला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.रस्ते,गटारे,तलावाचे सुशोभीकरण,मार्केट,हॉस्पिटल, समाज मंदिरे,पाणी पुरवठा,अशी अनेक जनहिताची कामे मार्गी लावली.बनवाबनवी आणि पळवापळवी,आमच्या रक्तात नाही.वसईला पाणी देऊ नका,म्हणून पालघरमध्ये आंदोलने करणारे मनपा मुख्यालयावर मोर्चे काढून निर्लज्जपणे तोंड वर करुन विचारतात वसईकराना पाणी का देत नाही ? बेशरमपणाची तर हद्दच झाली.सुडाचे राजकारण करण्यात यांची हयात गेली,तर आम्ही मात्र परिसर विकासाचे राजकारण करत आलो,कारण आमची बांधिलकी लोकांशी आहे.यांच्याकडे ना विकासाचे व्हिजन ना उमेदवार,त्यामुळे बाहेरच्याना आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली तसेच दुसऱ्या पक्षातील उमेदवारांची पळवापळवी करून जनतेची बनवाबनवी करण्यात यांनी धन्यता मानली.विरोधाला विरोध करणे,हा यांचा गोरखधंदा… आता घोडामैदान जवळ आहे,उतरा मैदानात होऊन जाऊ द्या एकदाचे…होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *