
प्रतिनिधी : दलित पँथर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने विशेष सभेचे आयोजन मा.अविश राऊत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली चिंतामणी मंगल कार्यालय,पालघर पुर्व नवली येथे करण्यात आले.सदर सभेत अनेक महत्वपूर्ण व विविध घटनात्मक निर्णय एकमताने घेण्यात आले. तसेच सभेत विविध महत्वाची व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या व प्रमुख पदाधिकारी यांची खांदेपालट करण्यात आली. त्यात जव्हार मोखाडा तलासरी व विक्रमगड या चार विभागाचे विभागीय जिल्हा अध्यक्ष पदी बबलू शंकर शेळके व महिला जिल्हा संघटक पदी चंदना जाधव, महिला जिल्हा अध्यक्ष पदी मोहिनी जाधव, जिल्हा प्रमुख सल्लागार पदी दिवाकर गंगाराम जाधव यांच्या नियुक्त्या सर्वानुमते करण्यात आल्या. तसेच जव्हार तालुका अध्यक्ष पदी विजय सोन्या वरठा ,जव्हार तालुका उपाध्यक्ष पदी रेवजी सखाराम गोंड व सीताराम सोमा पारधी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या वेळी जिल्हा अध्यक्ष बिंबेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भावेश दिवेकर, लहानु डोबा, जिल्हा महासचिव जगदीश राऊत ,जिल्हा कोषाध्यक्ष भरत महाले,जिल्हा सचिव संतोष कांबळे,जिल्हा सल्लागार कल्पेश गायकवाड, पालघर तालुका अध्यक्ष रोहित चौधरी,पालघर ता. उपाध्यक्ष अहमद खान,पा.ता.महासचिव दिलीप साळुंखे,पा.ता. उपकार्याध्यक्ष रोहित खेडेकर, तालुका सचिव योगेश राऊत,डहाणू तालुका अध्यक्ष विनायक जाधव ,उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे, मोखाडा तालुका महासचिव कल्पेश लोखंडे, महिला तालुका अध्यक्ष स्नेहा जाधव,कार्याध्यक्ष मरिना रिबेलो, सफाळे .वि.उपाध्यक्षा सुप्रिया भालेराव, सफाळे वि.सहसचिव स्वप्नाली गमरे ,वाणगाव शहर अध्यक्ष जीभाऊ अहिरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.