

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजि भिडे नामक व्यक्तिने काल दोन समाजात तेढ निर्माण व्हावे म्हणून भगवान गौतमबुद्धांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ म्हणून रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया(संस्थापक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ) राष्ट्रीय नेते मा. डॉ. राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार आज रिपाइंच्या शिष्टमंडळाच्या वतिने विरार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. दबडे यांची भेट घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली तशाप्रकारचे पत्रक वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले असुन संबंधित घटनेचा प्रतिकात्मक निषेध म्हणून तसेच या जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा असे सांगुन वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना तथागत गौतमबुद्धाची मूर्ती देण्यात आली. यावेळि उपस्थित रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडियाचे पालघर जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी , जिल्हा सरचिटणीस प्रफुल खंडागळे, जिल्हा सचिव जगदिश प्रसाद कोरी, संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मनोज रुके , समाजसेवक प्रविण जाधव , प्रविण कांबळे , जावेद खान, विशाल खैरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.