

शिवसेना भाजपा-आर.पी.आय.-रासप महायुतीचे 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार प्रदीप शर्मा हे गुरुवार दि.०३/१०/२०११ रोजी निवडणूक कार्यालय नालासोपारा (पश्चिम) येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
श्री. शर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते, समर्थक, चाहतेही रॅलीत सहभागी होणार आहेत. श्री. शर्मा यांच्यासोबत असतील. या रॅलीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून, ही रॅली सकाळी 10 वाजता
शिवसेना शाखा, सेंट्रल पार्क, नालासोपारा (पूर्व)-टाकी रोड मार्गे सुरू होऊन राधाकृष्ण हॉटेल-पुढे
फ्लाय ओव्हर ब्रिजवरून पाटणकर पार्क सिग्नलवरून पुढे वृंदावन गार्डन, श्रीप्रस्थ येथील निवडणूक
कार्यालयाकडे पोहोचेल.
विरार-नालासोपाराचा कायापालट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वासाने सोपवलेली ही जबाबदारी मी अत्यंत सच्चेपणाने पार पाडीन. इथल्या नागरिकांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे सांगत श्री. शर्मा यांनी शिवसेना, भाजप व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना पाठीशी उभे राहाण्याचे आवाहन केले.