

सच्चा जनसेवक म्हणून वसईकर जनतेची पोचपावती मिळवणारे लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा,पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.प्रचंड जनसागराला साक्ष ठेवून त्यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आ.ठाकूर व वसई ही नाळ आता इतकी घट्ट झाली आहे की ती सोडवणे आजवर एकाही राजकीय पक्षाला शक्य झाले नाही व पुढेही होणार नाही.१९९० पासून २००९ व २०१४ तेआजतागायत,अशी एकूण ५ आमदारकी जिंकणारे आ.ठाकूर आता डबल हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.वसईकर जनतेने आ.ठाकुरांना प्रत्येक वेळी डोक्यावर घेतले,त्याबदल्यात ठाकुरानी विकासकामांच्या माध्यमातून त्याची उतराई केली.त्याचीच पुनरावृत्ती २४ ऑक्टो.रोजी होणार आहे.लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे ठाकूर अशी ओळख उभ्या महाराष्ट्रात झाली ती केवळ त्यांच्या कार्याने….गेली २५ वर्ष विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती,सहकारी बँका,मजूर संस्था,पंचायत समिती व स्थानिक ग्रामपंचायती ताब्यात राखणे,हे सोपे काम नाही,पण ते त्यांनी करून दाखवले.त्यांनी सुरू केलेल्या वसई तालुका कला -क्रीडा महोत्सव,माही वसई व महापौर मॅरेथॉन स्पर्धानी या तालुक्याला राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले.या स्पर्धेतील अनेक खेळाडू जिल्हा,राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.त्यांच्याच संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या माही वसईने तर लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
अवघ्या पाचशे स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेला कला क्रीडा महोत्सवात आता ५० हजाराच्यावर स्पर्धक भाग घेत असतात.महापौर मॅरेथॉन स्पर्धेची नियोजनबद्ध आखणी व अंमलबजावणी वाखाणण्याजोगी असते.
माझ्या तालुक्यातील होतकरू खेळाडूंना इतरत्र संधी मिळायला हवी,यासाठी ते करत असलेले प्रयत्न नक्कीच कौतूकास्पद आहेत.
कला-क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना त्यांनी कधीही परिसर विकासाकडे दुर्लक्ष केले नाही.ग्रामीण भागातील विकासकामे आर्थिकनिधी अभावी रखडता कामा नयेत,यासाठी त्यांनी आपल्या आमदार निधीचे वाटप मुक्तहस्ते केले.आ.ठाकूर यांनी गेल्या २५ वर्षात मार्गी लावलेली विकासकामे शेकडो कोटीच्या घरात आहेत.पाणी,वीज,रस्ते,गटारे,
शिक्षण,समाज मंदिर,अंगणवाड्या,असे एक ना अनेक ज्वलंत प्रश्न त्यांनी मार्गी लावले.आपल्या तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागावा,यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व त्याला मिळालेले यश लक्षात घेता त्यांना जनतेने दिलेले लोकनेते पद हे नक्कीच कौतुकास्पद आहे.लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आ.ठाकूर यांनी वसई-विरारच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,म्हणून भगीरथ प्रयत्न केले व त्यास यश आले.त्यामुळे वसईकर जनता त्यांना पुन्हा एकदा त्याच उंचीवर नेऊन ठेवणार आहे,हे मात्र निश्चित..