काल वसई विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणारे आ.हितेंद्र ठाकूर यांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला आहे.गावागावात पदयात्रा काढून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.कार्यकर्त्यांचे मोहोळ,नियोजनबद्ध आखणी,मतदारांशी प्रत्यक्ष संवाद व परिसर विकासाचे व्हिजन,या शिदोरीवर आ.ठाकूर यांच्या प्रचाराचा भर आहे.प्रत्यक्ष उमेदवार आपल्याशी थेट संवाद साधतो,हे पाहून मतदारही सुखावतात.आ.ठाकूर यांचा ग्रामीण भागातील जनतेशी असलेला ४० वर्षाचा स्नेहसंबंध,तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी केलेली धडपड व परिसर विकासासाठी घेतलेले कष्ट इ.कारणांमुळे त्यांना सर्वत्र मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आज प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मतदारांच्या
गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
परिसर विकासाचे स्वप्न उराशी बाळगत आजवर अनेक विकासकामे करत आलो व भविष्यातही घेतलेला हा वसा तडीस नेणारच, यावर त्यांच्या प्रचाराचा भर आहे.
मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी असे हे त्यांचे प्रचाराचे बोधवाक्य आहे. परिसर विकास हा केवळ तुमच्या सहकार्यावर व मदतीवर अवलंबून आहे.या मार्गातील अडथळे,मी याच जोरावर पार करत आलो व पुढेही तेच करणार आहे.असे भावनिक आव्हान ते आपल्या भाषणात करत असतात व त्यास ग्रामीण जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.प्रचाराच्या दरम्यान जागोजागी सुखद अनुभव येत असतो,एका गावात एका वृद्ध ७५ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेशी संवाद सुरू असताना,ती महिला म्हणाली,
बाबा आमदार म्हणून तूच हवास,तुझ्यामुळे मला आज दोन घास जेवायला मिळतंय,माझं पेन्शन अडकल होतो,तुझ्या एका फोनवर माझे पेन्शन सुरू झालं,तू खूप मोठा हो रे बाबा… अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जागोजागी ऐकायला मिळतात.सत्तेसाठी कोलांट्या उड्या मारणाऱ्या आयाराम- गयारामाच्या या युगात अपक्ष आमदार या नात्याने केलेल्या विकासकामांना पोचपावती देण्यासाठी लोकांना प्रतीक्षा आहे आता २१ ऑक्टो.या तारखेची…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *