स्नेहा जावळे यांचे वृत्त काव्य

=======================

” श्रध्दांजली आरे “
रात्रीत घात केला या निष्ठुर
पर्यावरण प्रेमी सरकारनी.
रात्रीत खेळ केला या झाडे
वाढवा म्हणाऱ्याच सरकारनी.
काय ह्याच खर ? काय खोट
हे बोलतात, ते कळेना झाल .
आरे मध्ये आज कलम 144
सामान्यसाठी लागु का केल?
नोट बंदी रात्रीत झाली बॅंकेत
सामान्य रांगेत उभे दिसले .
निषेध करणारे अदित्य ठाकरे
रात्रीपासुन नाहीच दिसले .
आता कळतेय कुणाची कुणा
सोबत का झाली आहे युती .
कुणाच्या फायद्यासाठी युतीत
आरेची झाडे गेली आहेत सती.
सोईसकरपणे आरेची बातमी
युतीच्या नेत्यांनी जावलली .
सामान्यांची मोफत आॅक्सीजन
सुविधा रातोरात संपवली .
इतक्या त्तपरतेनी का दिलीय
आरेला घातपाती तिलांजली .
33 करोड झाडे लावु म्हणत
सरकारची आरेला श्रध्दांजली.

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *