काल आ.क्षितिज ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी जो जनसागर उसळला तो *भूतो न भविष्यती* असा होता. तरुणाईचा उत्साह अक्षरशः ओसंडून जात होता.हे शक्तिप्रदर्शन नव्हते,तर अलोट प्रेमाचे ते प्रतिक होते.आजवरच्या गर्दीचे सारे रेकॉर्ड उन्मळून पडले,असा तो कार्यकर्ते,समर्थक व सर्वसामान्य नागरिकांचा होता.समोर कोणतेही आव्हान असताना आ.क्षितिज ठाकूर यांनी ज्या शोषित समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला,त्यांची कामे मार्गी लावली त्या मंडळींची ती मांदियाळी होती.
*आले बहुत,येतील बहुत,पण या सम हा* असा निर्धार करत हा जनसागर लोटला होता.राजकीय क्षेत्रात भाड्याने माणसे आणण्याची संस्कृती फोफावत असताना स्वयंस्फूर्तीने १० हजाराच्यावर जनसागर लोटतो,यातच आ.क्षितिज ठाकूर यांच्या *प्रचंड* विजयाची बीजे रोवली गेली आहेत.काल दुपारी १२ नंतर हळूहळू पिवळ्या वादळाची चाहूल विरोधकांना लागली,संशयाची पाल मनात चुकचुकु लागली.या वादळात आपला टिकाव लागू शकेल का ? आणि झालंही तसेच….
क्षणार्धात पिवळे वादळ प्रचंड वेगाने घोंगावू लागले व वसईच्या इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद झाली…एवढा प्रचंड जनसागर आला तरी कुठून ? त्यातील तरुणाईचा ओसंडून जाणारा उत्साह पाहून ही मंडळी केवळ आ.क्षितिज ठाकूर व आ.हितेंद्र ठाकूर यांनी आजवर केलेल्या आपल्या कामाची उतराई करण्यासाठी आल्याचे जाणवले.इतका प्रचंड उत्साह,अलोट प्रेम,एका तरुण तडफदार युवा आमदाराला लाभते,ही बाब नक्कीच उल्लेखनीय अशी आहे.त्यामुळे नालासोपारा विधानसभा निवडणूक ही एकतर्फी झाल्यास,कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *