
लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुजन महा पार्टीला संपूर्ण भारतभर निवडणूक चिन्ह ‘शिट्टी’ ही निशाणी दिली होती सदरचे चिन्ह हे बहुजन महा पार्टीसाठी राखीव असल्याचे मत जिल्हाधीकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पालघर यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले होते.बहुजन महा पार्टी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवार उभे करत असल्याने आमच्या पक्षाचे उमेदवार सर्व ठिकाणी ‘शिट्टी’ हेच निवडणूक चिन्ह घेणार आहेत आमच्या पक्षातर्फे नालासोपारा विधानसभेचे उमेदवार मोहसीन शेख हे निवडणूक लढवित असुन यांनाच सदरचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे आमच्या बहुजन महा पार्टीचे सर्व उमेदवार यांना निवडणूक चिन्ह शिट्टी हे चिन्ह मिळावे यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग व अन्य ठिकाणी पत्र व्यवहार केला असुन आम्हाला शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळेल याबद्दल मला पूर्ण विश्वास असल्याचे बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.