

प्रचारासाठी फिरणाऱ्या क्षितीज ठाकूर यांना घाम फुटतो आहे. पण हा घाम कडक उन्हामुळे नसून लोकांच्या प्रश्नांना आणि संतापाला तोंड देतांना ते हैराण झाले आहेत. नुकताच समेळ पाडा परिसरात ते प्रचाराला गेले असताना संतप्त रहिवाशांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांचा मारा केला. त्यामुळे प्रचाराचा रोखच बदलून गेला.
आमदार कधी नव्हे ते दिसले म्हणून लोक समस्या घेऊन तुटून पडले होते. या परिसरात पावसाळ्यात होणारे हाल, पूर आणि वीजेची भरमसाट बिले याचे काय करणार ते सांगा असे लोक त्यांना जाब विचारत होते. विकासकामांबाबत बोलणअयासारखे नसल्यामुळे मी गेल्या दहा वर्षात काय केले त्यापेक्षा तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे, अशी गुळमुळीत भाषा क्षितीज ठाकूर करत आहेत.
सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार, नालासोपारात 77.37 टक्के आणि विरारमध्ये 30.45 टक्के आरक्षित भूखंडांवर भूखंड माफियांचा कब्जा आहे. सरकारी जमीनी हडपल्या, अनधिकृत बांधकामं उभी केली, गटारांवर साधी झाकणं नाहीत, पावसात पूर येतात, नाल्यात पडून गरीब मुलं जीवानिशी जातात. हा कुठला विकास, याला जबाबदार कोण, या प्रश्नांना उत्तर देताना बविआच्या नेतृत्त्वाला घाम फुटला आहे. नगरसेवकांची मुजोरी, पैसेखाऊ वृत्ती, झोलझाल कर या सगळ्यावरच रहिवासी प्रचंड नाराज आहेत हे त्यांच्या बोलणअयातून समोर येत आहे.
बविआने आजवर मोठमोठ्या गप्पा मारल्या. लोकसभेच्या वेळी वारेमाप आश्वासने दिली. पण यंदाही आमची घरं, दुकानं चार चार फूट पाण्यात होती. आजही पाणी, आरोग्यसेवा, रुग्णालय, बाग, गटारी, क्रीडांगणे, वाहनतळ, वीज, फेरीवाले, वाहतूक नियमन अशा कितीतरी समस्यांबाबत बविआचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक बेफिकीर आहेत. त्याबद्दल बविआच्या आता दिसू लागलेल्या आमदाराला आणि कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले जाऊ लागल्याने प्रचार नको पण प्रश्न आवरा, अशी वेळ बविआवर आली आहे. त्याचवेळी एक पर्याय म्हणून महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा हे या वेळी रिंगणात असल्याने या बट्ट्याबोळाचे उत्तर आता जनताच येथे बदल घडवून देईल, असे प्रदीप शर्मा यांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादातून दिसून येत आहे.