

विरार : बहुजन विकास आघाडीचा बाल्लेकिल्ला असलेल्या करगिलनगरमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रदीप शर्मा यांनी अनपेक्षित धड़क दिली.
या धावत्या भेटीत मनवेलपाडा येथील मंडळाच्या देवीचे दर्शन घेऊन कारगिल नगर येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात ते नतमस्तक झाले. सोबतच येथील शिवसेनेच्या शाखेलाही शर्मा यांनी भेट दिली.
अगदी रात्रीच्या सुमारास प्रदीप शर्मा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अनेपक्षित भेट दिल्याने या भागात ‘बदला’चे वारे वाहिले. या झंझावाती दौऱ्यात शर्मा यांनी या भागातील समस्यांचा ‘आंखो देखा हाल’ही पाहिला.
कारगिल नगर हा भाग आतापर्यंत बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागात बहुजन विकास आघाडीच्या चार नगरसेविका आणि एक नगरसेवक आहे. त्या तुलनेत या भागाच्या विकास झालेला नाही. हा भाग नेहमीच समस्यांशी दोन हात करत राहिला आहे. तर बहुजन विकास आघाडी नेहमीच या भागाला गृहीत धरत आल्याने येथील नागरिकांत प्रचंड रोष आहे.
कलपर्यंत या भागातील रस्त्याचे काम झाले नव्हते; ते निवडणुकीच्या तोंडावर करून बहुजन विकास आघाडीने करून येथील लोकांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुजन विकास आघाडीचा हा स्वार्थीपणा लपून राहिलेला नाही.
प्रदीप शर्मा यांच्या रूपाने युतीने नालासोपारा मतदारसंघात बदल घडवून आणेल; असा उमेदवार दिल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असतानाच सोमवारी रात्री कारगिल नगर भागात अनपेक्षित धड़क दिल्याने दुधात साखर पडल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रदीप शर्मा यांच्या या झंझावाती दौऱ्याने बहुजन विकास आघाडीची मात्र झोप उडाली होती.