
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. प्रदीप शर्मा यांनी सोमवारी सकाळी नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांची संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. भावी आमदार थेट स्टेशनवर धडकल्याने प्रवाशांनीही त्यांना गराडा घातला होता. विरार, नालासोपारा येथील रहिवाशांच्या रोजच्या रेल्वे प्रवासातील यातायात सुसह्य करण्यासाठीच आपण मेट्रो, नवी मुंबई लोकलसेवा, रखडलेले पूल, रस्ते आदी पर्याय त्वरेने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शर्मा यांनी या वेळी सांगितले. लोक मला सुपरकॉप म्हणतात पण, या सकाळच्या वेळी लोकलमधील प्रचंड गर्दीचा सामना करणाऱ्या माताभगिनी या माझ्यासाठी सुपरह्युमन आहेत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.