

नालासोपारा (प्रतिनिधी): रविवार दि.१३ ऑक्टोंबर २०१९ रोजी सायं.७ वाजताच्या दरम्यान भाजपच्या शहर सरचिटणीस प्रियांका बांदेकर आणि शिवसेनेचे शहर उपप्रमुख यांचा प्रभागात प्रचार सुरू असताना “प्रदीप शर्मा आगे बढो”, “शिवसेना भाजपा महायुतीचा विजय असो”, “चोर की पोलीस”, अशा घोषणा सुरू होत्या , तितक्यात अचानक बविआचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविकेचे पती सुनील पाटील चाळीतील एका रूममधून बाहेर आले आणि म्हणाले तुम्ही मलाच चोर म्हणालात, अनोळख्या रुममध्ये तुम्ही काय करता? असा प्रश्न शाखाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि नारायण घर्वे यांनी प्रश्न विचारला असता , विषय न वाढवता प्रियांका बांदेकर यांनी तुम्ही चोर आहात का ? मग कशाला रागावता असा प्रश्न विचारत या विषयास तिथेच विराम दिला, सोबत शहर सचिव वर्षा अनावकर, तृप्ती रंपुरे , महिला विभाग संघटक वैशाली पालव, सुभाष पालव, शिवसैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होत्या. मात्र सध्यातरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.