
काल रात्रीच्या अंधारात, प्रत्येक निवडणूकीप्रमाणे सैरभैर झालेल्या बहूजन विकास आघाडीच्या गुंडांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करत असताना मुद्दाम काहीजणांनी त्यात व्यत्यय आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्भवलेली परीस्थिती पोलीसांनी अतिशय उत्तमरीत्या हाताळली, मी त्यांचे आभार मानतो.
त्याचवेळी आपणा सर्वांना हे आवाहन करतो की कोणत्याही प्रकारे ह्या हुल्लडबाजीला भीक न घालता आपलं काम करत रहा. आपण हीच अरेरावी मोडून काढायला निवडणूक लढवतोय आणि सुज्ञ मतदारांच्या विश्वासावर आपण नक्कीच विजयी होत आहोत. आपल्या विजयाची खात्री त्यांना प्रत्येक चेहऱ्यावर दिसतेय, म्हणूनच हा गोंधळ चालू झालाय.
माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण आपल्या कामापासून अजिबात विचलीत होऊ नका. उद्याचा दिवस ह्या मुजोर चोरांच्या दादागिरीचा शेवटचा दिवस ठरणार आहे, आपल्याला मिळणारं प्रत्येक मत ह्यांना सणसणीत चपराक असणार आहे, तेच आपलं ध्येय असुद्या.
जास्तीत जास्त मतदारांना ह्या लोकशाहीच्या सोहळ्यात मतदान करता यावे ह्याकरता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा.
माझा व्यवस्थेवर आणि मतदारांवर विश्वास आहे, तुमचाही असायला हवा.
शांतता राखा. अफवांना बळी पडू नका. बिनधास्तपणे काम करा आणि मतदारांना सर्व ते सहकार्य द्या, असे प्रदीप शर्मा यांचे म्हणणे आहे।