श्रीमती प्राजक्ता लवंगारे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार श्री डॉ. विजय भुकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर यांचे मार्गदर्शनाखाली आज दि 20/10/2019 रोजी राजोडी ता वसई जि.पालघर येथील परिसरात केळीच्या बागेत लपवुन ठेवलेला अवैध ताडी साठा पकडण्यात श्री सुभाष जाधव निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक पालघर यांच्या पथकाला यश आले
सदर अवैध ताडी संदर्भात महाराष्ट्र दारूबंदी नियम 1949 अन्वये गुन्हा नोंद केला आहे .या गुन्ह्यात फरार आरोपी तानासिंग उर्फ राजू पलवेशमूण्तू नाडार रा.राजोडी ता .वसई याचेवर गुन्हा नोंदवण्यात आला.सदर गुन्ह्यात 35 ली,40ली क्षमतेचे ताडी ने भरलेले ड्रम जप्त करण्यात आले यामधे एकूण 2035ली ताडी जप्त करण्यात आली. सदर जागेत ताडी विक्रीतून रोख रक्कम 16,311/-असा एकुण रु 63,931/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर ताडी साठा करून ती मुंबई व ठाणे येथील ताडी दुकानदार यांना शिळीताडी पुरविण्यात येते तसेच ताडी साठा करण्यासाठी वापरत असलेली जागा कुलुपबंद करण्यात आली आहे
सदरची कार्यवाही निरीक्षक श्री सुभाष जाधव राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पालघर यांनी केली. पालघर विभागाचे निरीक्षक श्री दिलीप बामणे व त्यांचा स्टाफ तसेच वसई विभागाचे निरीक्षक श्री मासमार व दुय्यम निरीक्षक श्री होळ व त्यांचा स्टाफ तसेच दुय्यम निरीक्षक श्री काटकर व दुय्यम निरीक्षक मिसाळ यांनी मदत केली
पुढील तपास सुरु आहे सुभाष जाधव निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *