


प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतात उभे असलेले भातपिक तसेच कापणी व काढणी झालेल्या भातपिकासह इतरही भाजीपाला, फळपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.मात्र शेतकऱ्यांनी या संकटामुळे खचून न जाता संकटाचा धीराने सामना करावा. व झालेले नुकसानाचे त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी या एका उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नव्हता अशा शेतकऱ्यांनाही राज्य शासन नुकसानभरपाई देणार असल्याचे निर्णय झाले असल्याचे समजते.परिणामी राज्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, पंचनामे करताना विलंब झाल्यास नुकसानीचा फोटोसुद्धा ग्राह्य धरणार असल्याची मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दि. 2 नोव्हें 2019 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब,जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाने प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या देखरेखीत व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ,सरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मार्फत त्या त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतपिकांच्या नुकसानीची माहिती निपक्ष राज्य शासनाला देवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. व राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही या साठी प्रत्येक जिल्ह्यात निपक्ष पंचनामे करण्यात यावे. व सदर पंचनामे व मंजूर नुकसान भरपाई प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन प्रयंत पोचावे अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी पालघर यांनी देण्यात आले. यावेळी अविश राऊत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष , बिंबेश जाधव जिल्हाध्यक्ष पालघर, जगदीश राऊत जिल्हा महासचिव,भरत महाले जिल्हा कोषाध्यक्ष, संतोष कांबळे जिल्हा सचिव,सिद्धार्थ जाधव प्रमुख सल्लागार, रमाकांत गायकवाड जिल्हा सहसचिव , अजिंक्य म्हस्के जिल्हा युवा अध्यक्ष, कल्पेश गायकवाड प्रमुख सल्लागार,रोहित चौधरी पालघर तालुका अध्यक्ष,दिलीप साळुंखे तालुका कार्याध्यक्ष,अहमद खान तालुका उपाध्यक्ष, मोहिनी जाधव जिल्हाध्यक्षा महिला, सुमती कांबळे जिल्हा महासचिव महिला,मरिना रिबेलो पा.ता.कार्याध्यक्षा महिला, शुभांगी शेष सफाळे विभाग कार्यकारणी, जिभाऊ अहिरे वानगाव शहराध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.