“राष्ट्रीय विधी सेवा दिवस” या उपक्रमाचे आयोजन दि.०९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले.
सदर उपक्रमांतर्गत पालघर तालुका विधी प्राधिकरण व सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे पॅरालिगल व्हाॅलेंटियर मार्फत समाजातील वंचित घटकांपर्यंत न्याय व्यवस्था पोहचवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उपक्रमादरम्यान पालघर न्यायालय परिसरात दांडेकर विधी महाविद्यालयाच्या स्वंयसेवकामार्फत दोन मदत कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
मदतीसाठी,मदत कक्षात आलेल्या गरजूंना पालघर न्यायालयातील विधी सेवा पॅनलवरील ज्येष्ठ वकिलांमार्फत मदत व कायदेविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे दि.१७/११/२०१९ रोजी बोईसर येथील ,शिगाव या खेड्यात प्रत्यक्ष जाऊन तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.समस्यांचे व्यवस्थित पृथक्करण व वर्गवारी करून,परिसंच बनवला गेला.
दि.२३/११/२०१९ रोजी संबंधित शासकीय विभागाचे प्रतिनिधी व पालघर विधी सेवा प्राधिकरण मार्फत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
“जस्टिस टू आॅल” हे ब्रीदवाक्य खरोखरच सार्थकी लावत विधी स्वंयसेवकांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.
विधी शाखेचा अभ्यास करताना , सामाजिक भान जागृत ठेवून विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला.
आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा समाजव्यवस्थेच्या भक्कमीकरणासाठी वापरला जाणे किंबहुना आपण ज्या समाजात वावरतोय त्या समाजाच्या हितासाठी आपल्या परिने योगदान देणे हे आमचे परम कर्तव्य आहे असे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या “पॅरा लिगल टिम”ने सांगितले.
येत्या काळात सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात कायम “स्वरूपी विधी सहाय्यता कक्षाचे” अनावरण करण्यात येईल असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *