
पालघर जिल्ह्यात पोलीस दलाकडून दिनांक 26-11-19 रोजीच्या अनुषंगाने शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पालघर पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराकरिता श्री. गौरव सिंग पोलीस अधीक्षक, श्री विश्वास वळवी पोलीस उपअधीक्षक(गृह) श्री.डी.एस.पाटील प्रभारी अधिकारी पालघर पोलीस ठाणे उपस्थित होते.तसेच पालघर पोलीस ठाणे येथे राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस मित्र व नागरिक असे 60 जणांनी रक्तदान केले. तसेच वालीव पोलीस ठाणे येथे शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वालीव पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वालीव पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराकरिता श्री.विजयकांत सागर पोलीस उपअधीक्षक वसई श्री मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी नालासोपारा, श्रीमती अश्विनी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी वसई श्री कांबळे प्रभारी अधिकारी माणिकपूर पोलीस ठाणे श्री पुकळे प्रभारी अधिकारी वसई पोलीस ठाणे श्री सोनवणे प्रभारी अधिकारी विरार पोलीस ठाणे श्री. पाटील प्रभारी अधिकारी तुलिंज पोलीस ठाणे, श्री.लेंगरे प्रभारी अधिकारी अर्नाळा, श्री चौगुले प्रभारी वालीव पोलीस ठाणे हे उपस्थित होते. वालीव पोलीस ठाणे येथे राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वसई विरार नालासोपारा पोलीस उपविभागातील 32 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.