
प्रतिनिधी : संविधान गौरव समिती, वसई तालुका यांचे विद्यमाने ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात अण्णासाहेब विद्यामंदिर, विरार पूर्व या शाळेच्या भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची गीते सादर करून करण्यात आली. त्यानंतर अंजुमन ईस्लाम स्कूलच्या विद्यार्थ्यानी संविधानावर आधारीत कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये त्यांनी विविधतेत एकता हा संदेश दिला. कार्यक्रमाचे औपचारीक उद्घाटन मा. डाॅ. संतोष संगारे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. अंजुमन ईस्लाम स्कूलच्या विद्यार्थ्यानी उद्देशिकेचे मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये वाचन केले. व कु. दीक्षा महेश जाधव हिने सर्वाकडून प्रतिज्ञा वदवून घेतली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रोशन पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये संविधानाची महत्वाची कलमं विशद केली. तसेच सद्या उद्भवलेल्या परिस्थितीवर आपले मत प्रकट केले. मा. अॅड. वैशाली डोळस यांनी स्त्रीपुरूष समानता घराच्या उंबरठ्यापासून सुरू होणे आवश्यक आहे. स्त्रीयांनी आपल्यातील न्यूनगंडाची भावनादूर केली पाहिजे याबाबत परखड मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आंतरजातीय रोटी बेटी व्यवहारास प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोतपागर यांनी केले. तसेच यावेळी स.विधान गौरव समितीचे अध्यक्ष खलील शेख, माजी महापौर रुपेश जाधव, दिपंकर पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत बचुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रेय धुळे, प्रकाश कांबळे, विजय पवार, आदींनी विशेष मेहनत घेतली.