आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी.टी असणार गेस्ट ऑफ हॉनर

 

विरार(प्रतिनिधी)-इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वसई विरार महानगरपालिका सज्ज झाली आहे.८ डिसेंबर रोजी ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे.या स्पर्धेत अठरा हजार हून अधिक स्पर्धक सहभाग नोंदवणार आहेत. तसेच आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी.टी हे या स्पर्धेचे गेस्ट ऑफ हॉनर असतील.काल पालिकेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या मॅरेथॉनची सविस्तर माहिती देण्यात आली.या पत्रकार परिषदेसाठी महापौर प्रविण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत,अति.आयुक्त संजय हेरवाडे,मॅरेथॉन मुख्य समन्वयक पंकज ठाकूर,प्रकाश वनमाळी,संदेश जाधव, नगरसेवक महेश पाटील, सभापती माया चौधरी, परिवहन सभापती प्रितेश पाटील, रिद्धी विनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख व्यकंटगोयल, सुरक्षाचे चिफ ऑपरेटींग ऑफिसर सनी तठले आदि मान्यवर उपस्थित होते.इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा ही अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येते. तसेच ही स्पर्धा वसई विरार शहर महानगरपालिका व कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केली जाते.तर, आर्यन्झ स्पोर्ट्स पीआर आणि इव्हेंटकडून प्रमोट केली जाते.देशातील ही एकमेव राष्ट्रीय स्तरावरील धावण्याची स्पर्धा आहे ज्याचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते.

_____________________

 

आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी असणार गेस्ट ऑफ हॉनर-
मॅरेथॉनच्या दिवशी स्पोर्ट्स पर्सनची उपस्थिती असते. यावर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेने यावेळी सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन आणि ऑलिम्पियन गोपी टी. याला आमंत्रित केले आहे. आशियाई मॅरेथॉन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळणारा गोपी टी. हा पहिला आणि एकमेव भारतीय आहे. त्याने २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत २:१५.२५ अशी वेळ नोंदवली होती.

 

आघाडीच्या एलिट अॅथलीटचा सहभाग –
पूर्ण मॅरेथॉनमध्ये आर्मीचा राहुल पाल सहभाग नोंदवनार आहे. २:२१.५२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासोबतच त्याने अलाहाबाद मॅरेथॉन २०१९ चे जेतेपद मिळवले आहे. त्याला आर्मीचा सहकारी मोहित राठोडचे (उपविजेता २०१७) आव्हान असेल. अलाहाबाद येथे एएसआय पुणेच्या ब्रह्मप्रकाशने २:२४.५० आणि एअर फोर्सच्या सुखदेव सिंगने २:२७.५१ अशी वेळ नोंदवली. यासह आयबीव्हीव्हीएमएम २०१६ चा उपविजेता पंकज धाका, आर्मीचा रंजित मलिक व यूपीचा धर्मेंदर सहभाग नोंदवतील.
पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये गतविजेता शंकर मान थापा याकडे लक्ष असेल. त्याने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले व राष्ट्रीय क्रॉस कंट्रीत त्याने बाजी मारली.दार्जिलिंग हिल मॅरेथॉन २०१९ चे जेतेपद मिळवणाऱ्या दुर्गा बहादूरने १:०५.४८ अशी दिल्ली अर्ध मॅरेथॉनमध्ये वेळ नोंदवली.बीईजीच्या अंकित मलिक हा आयबीव्हीव्हीएमएम २०१७ चा विजेता होता. सिक्कीमचा अनिश थापा हा पीएसबी हाफ २०१९ चा विजेता आहे तर, वडोदरा हाफ २०१७ चा विजेता आर्मीचा२ एल. रंजन सिंग हे चमक दाखवण्यास सज्ज आहेत.महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये आरती पाटीलकडे सर्वांचे लक्ष असेल तिने गेल्या वर्षी तिसरे स्थान मिळवले. तिला रेल्वेच्या स्वाती गढवे, यूपीच्या अर्पिता सैनी आणि हिमाचलच्या गार्गी शर्माचे आव्हान असेल.

 

आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी.टी असणार गेस्ट ऑफ हॉनर
बॅटल रनचे हे चौथे सत्र असून हा गट मुख्य प्रायोजक इंडियाबुल्स होम लोन्सने सुरु केलेल्या गटात ११ किमी अंतरासाठी 30 हून अधिक संघ सहभागी झालेले पहायला मिळतील

 

मणीपाल सिग्ना फॅमिली रन-
हा गट पहिल्यांदा याच वर्षी सुरु करण्यात येणार आहे.मणीपाल सिग्ना फॅमिली रनमध्ये कुटुंब ५ किमी (टाईम) आणि ४ किमी (नॉन टाईम) अंतर एकत्र धावताना दिसतील. ३५ कुटुंबानी यासाठी नोंदणी केली आहे.

 

विशेष मॅरेथॉन ट्रेन –
इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ही ट्रेन सकाळी ३.०० वाजता चर्चगेट स्टेशनहून सुटेल व वसईला ४.२३ मिनिटांनी व विरारला ४.३१ मिनिटांनी पोहोचेल. ही ट्रेन सर्व स्टेशनवर थांबेल.स्पर्धकांना वसई स्टेशन व विरार स्टेशनहुन स्पर्धास्थळी पोहोचण्यासाठी निशुल्क वाहतुकीची सेवा देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *