

जेव्हा सारिपाटावरच्या सगळ्या सोंगट्या फिट्ट् बसतात…
आज नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झालेत.. हे तेच नाना पटोले आहेत ज्यांनी शेतकरी प्रश्नांवर मोदी सरकार संवेदनशील नाही म्हणून खासदारीचा राजिनामा मोदींच्या तोंडावर फेकुन मारनारे म्हणून एक स्वाभिमानी नेता म्हणून त्यांनी लौकीक मिळवला आहे… त्यानंतर नानांना भाजपाने प्रचंड त्रास दिला.. कायम अडचणीत आणलं गेलं.. पण नाना खंबीर राहिले.. देवेंद्र फडणवीसांच्या हिटलिस्टवर नाना कायमंच राहिले.. भाजपाची म्हणा किंवा देवेंद्रा ब्रॅव्होची संपूर्ण चांडाळ चौकडी कायमच नाना पटोलेंना विरोधक म्हणून तुच्छ लेखत राहिली.. पण नाना विरोधी भुमिकेवर अन् स्वाभिमानाच्या विचारांवर ठाम राहिले.. काँग्रेसची विचारधारा फार वेगळी आहे.. इथं उशिरा मिळतो पण न्याय हा मिळतोच.. त्या मानाने नानांना काँग्रेसने फार कमी कालावधीत मानाचे स्थान दिले.. कारण त्यांच्यातील क्षमता काँग्रेसने ओळखली असेही म्हणावे लागेल… तर मुद्दा असा आहे की दोन महिन्यापूर्वी ज्या नानांना ही टिम देवेंद्रा अतिशय तुच्छ लेखत होती.. आज त्याचं देवेंद्रजींना नाना पटोलेंना वारंवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला सभागृहात बोलु दिलं जावं याची याचना करावी लागेल.. ज्याला आपण कमी लेखत होतो ते आज आपल्या वरती हुकूम देनारे म्हणून बसले आहेत याची मनोमन चिडचिड ही फडणवीसांना निश्चित होत असेल.. नाना करारी आहेत.. त्यांनी भाजपाचे सुडाचे राजकारण भोगले आहे.. अर्थात माणूस म्हणुन त्यांच्या मनात रोष निश्चित पणे असेल.. आता ते सभागृहाचे अध्यक्ष आहेत.. ते सभागृहाचे कर्तेधर्ते आहेत.. त्यांचं नियमावर कटाक्षाने बोट असेल त्यातल्या त्यात भाजपा नेत्यांवर तर अधिक बोट असेल.. त्या बाबतीत टिम फडणवीसांचं उलटं आहे.. प्रचंड आक्रस्ताळेपणा,चिडचिड,आरडाओरड,रडारड, आदि कला गुण त्यांच्यात ठासुन भरले आहेत.. अर्थात हे सभागृहात अजिबात चालनार नाही आणि नाना पटोले सारखा करारी माणूस तर हे अजिबात चालवुन घेनार नाही.. मोदीसारख्या नेत्याविरोधात थेट दबंगाईने वागनार्या नानांसमोर फडणवीस तर किस झाड की पत्ती.. प्रसंगी फडणवीसांनी जास्तचं एकपात्री नाटकाचे प्रयोग चालु केले तर त्यांना सभागृहातुन थेट हाकलुन लावायलाही नाना पटोले घाबरनार नाहीत.. एकुणचं काय भविष्यात आरडाओरड करनारी भाजपा अन् त्याला वेळोवेळी चाप लावनारे नाना ही रायव्हलरी बघायला मजा येनार आहे.. एक शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांच्या मनात आदरणीय असलेल्या श्री नाना पटोले यांचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे…