
प्रतिनिधी- विनोद चव्हाण
वारकरी परंपरा जपणारे भजन मंडळ म्हणून अचानक रेल्वे प्रवासी भजन मंडळ मागील अनेक वर्ष पश्चिम विभाग मध्ये कार्यरत आहे, या मंडळानी १४वी भव्यदिव्य भजन स्पर्धा आज मोरगाव, नालासोपारा पूर्व येथे आयोजित करण्यात आली. या भजन करिता तिन्ही लाईन मधिल एक हजार पेक्षा जास्त वारकरी यांनी सहभाग घेतला.
सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक संस्था आज नावारूपाला आहेत अशीच असेच एक संस्था म्हणजे अचानक रेल्वे प्रवासी भजन मंडळ मागिल १४ वर्षा पेक्षा जास्त वर्ष पश्चिम विभाग मध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व वारकरी परंपरा जपण्याचे काम आज हि रेल्वे प्रवासी भजन मंडळ करित आहे. तसेच संत ज्ञानेश्वर माऊली सामजिक संस्था व श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (रजि.) या संस्थे सोबत सलग्न आहेत.
वंचित गरजू मुलांना मदत करणे, अतिवृष्टी व गरजू व्यक्तीना मदत करण्याचा वास या मंडळाने अविरत सुरू ठेवला आहे.
वारकरी परंपरा व हरहुन्नरी गायक यांना हक्काचे गायना करिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम हे मंडळ करीत आहे. यावर्षी पश्चिम, मध्य व हार्बर लाईन मधिल 30 भजन मंडलानी स्पर्धेत सहभाग घेतला.
श्री. संत सेवा भजन सामजिक संस्थेचे उपाध्यक्ष मा. शिवाजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्योळीत करण्यात आला. या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय प्रजापती साहेब, अध्यक्ष राजेश उतेकर, सचिव जनार्दन धयाळकर, ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ यांचे सचिव जयराम पवार, श्री. संत सेवा भजन सामाजिक संस्था अध्यक्ष मा. वसंत प्रभू, प्रभाकर सावंत, सतीश ढगाळे सुनिल कदम, धनवडे, अरविंद माऊली, दिपेश शेडगे, मयूर सावंत, माझी सैनिक मा. गणपत जलगावकर, शिवसेना उपशाखा प्रमुख शिवाजी भानत व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमचे सूत्र संचालन शाहीर नितीन रसाळ यांनी केले तसेच या भजन स्पर्धे करिता मुख्य अभ्यासू परीक्षक म्हणून ह. भ. प. योगेश म. प्रसादे आळंदी देवाची येथून खास बोलण्यात आले होते.
