

वसई: वसईतील भूईगांव येथील सरकारी पानथळ जागेवर अनधिकृत कोळंबी प्रकल्पांवर महसूल विभाग ,वसई विरार महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रकल्पांच्या बंधा-यांना भगधाड पाडत ते उद्धस्त केली आहेत .यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठा पॅलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्रातील पानथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी “वनशक्ती” या संस्थेने मूंबई उच्च न्यायालयात 2013 ला जनहित याचीका दाखल केलेली आहे.2016 ला याबाबत भूईगांव खुर्द व भूईगांव बूद्रूक येथील खारटनावरील तिवरांची तोड करून तेथे अनधिकृत कोळंबी प्रकल्प व बांधकामे केली आहेत का याबाबत न्यायालयाने अहवाल मागीतला होता.सबंधीत प्रशासनाला त्यानंतर हे कोळंबी प्रकल्प उध्वस्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही कारवाई मात्र होत नव्हती.वसईतील पर्यावरण संवर्धन समीतीतर्फे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता.जागतीक पातळीवर ग्लोबल वाॅर्मींगचा प्रश्न गंभीर असताना पर्यावरणाची हानी पोहचवणा-यांवर कारवाई होत नसल्याबद्दल समन्वयक समीर वर्तक व यांच्या सहका-यांकडून गेल्या आठवड्यात तहसीलदार कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यास सुरूवात करण्यात आली होती.जिल्हाधिकारी डाॅ.कैलाश शिंदे यांनी त्यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेत लवकरच कारवाईचे संकेत दिले होते.दहा ते बारा जेसीबीच्या सहाय्याने दिवसभरात 19 कोळंबी प्रकल्पांवर हि कारवाई करण्यात आली.त्याचप्रमाणे या कोलंबी प्रकल्पासाठी विज पुरवठा खंडीत करण्यात आला असून म.रा.वि.मडळास विजेचे जनीत्र काढण्यास सांगण्यात आले आहेत.कोळंबी प्रकल्प परिसरात अनधिकृत झोपड्याही तोडण्यात आल्या आहेत.आजच्या या कारवाईनंतर पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वसईचे तहसीलदार किरण सुरवसे,प्रांताधीकारी स्वप्नील तांगडे,नायब तहसीलदार प्रदीप मुकणे,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.अश्विनी पाटील,माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे,पालिका उपायुक्त किशोर गवस तसेच पोलिस कर्मचारी व पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.