मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धडक कामगार युनियनने लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात दहा लाखाहून अधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धडक कामगार युनियनचे महासचिव अभिजीत राणे यांनी पाठिंब्याची घोषणा करताना सांगितले की “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात कामगारांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. कामगारांवर संघर्षाची वेळ येऊ न देता नेहमीच न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. धडक कामगार युनियन पक्ष निरपेक्ष कामगार संघटना असली तरी देशाला अराजक आणि दहशतवादा पासून वाचवायचे असेल तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे ही काळाची गरज आहे त्यामुळे एन डी ए ला आम्ही सक्रिय पाठिंबा देत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे लोकसभा निवडणूक तर जिंकतीलच पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशाचाही पाया याच निवडणुकीत घालतील” असा विश्वास अभिजीत राणे यांनी व्यक्त केला. धडक कामगार युनियनचे नेते कार्यकर्ते भाजपा आणि शिवसेनेच्या प्रचारात दे धडक बे धडक या ब्रीदवाक्या प्रमाणे उतरतील असेही अभिजीत राणे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *