


वसई तहसील कार्यालयावर आदिवासी एकजूट संघटनेचा आज दिंनाक १३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता वसई एस टी डेपो येथून हजारोंच्या संख्ये ने मोर्चा निघाला होता त्या मोर्चात आदिवासी शेतकरी शेतमजूर तसेच कोळी महीलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग झाले असल्याने मोर्चात खालील प्रमाणे प्रमुख मागण्या होत्या १)नैसर्गीक आपत्ती मधे झालेल्या नुकसान भरपाई मिळणे. २)नाळा बेना पट्टी (आदिवासी वस्ती )येथे पिण्याच्या पाण्याची सोय . ३)अर्नाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री महेन्द्र पाटील ग्राम विकास अधीकारी श्री.पंकज संख्खे ग्रामपंचायत सदस्य भरत भोईर दयानंद भोईर यानीं श्रीमती नन्ही बेगम सिया यानां जातीवरून शिविगाळी करून तीला मारहाण केले तसेच विनय भंग गेल्या प्रकरणी यांच्यावर कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे.
अश्या एकूण तीन मागण्या मोर्चा मधे मांडण्यात आल्या नाळा बेना पटी(आदिवासी वस्ती)येथे गेल्या ४० वर्षापासून आदिवासी वस्ती आहे.वस्तीत आदिवासी बांधवांचे झोपडी वझेचे घर आहेत राहत्या घराला महानगर पालिका घरपट्टी पाणी पट्टी कर वसूल करते.पाणी पट्टी वसूली करत असून देखील गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आदिवासी बांधवाना पाण्यासाठी हंडे घेऊन वन वन फिरावे लागत आहे सातत्याने पाण्याची मागणी करत असून देखील शासन प्रशासन दुर्लक्ष करत होते म्हणून शेवटी आदिवासी एकजूट संघटनेनी आज थेट रस्त्या वर उतरून वसई एस टी डेपो येथून हजारो च्या संख्ये ने मोर्चा काढून थेट तहसीलदार कार्यालया समोर संघटनेच्या हजारो मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठीय्या मांडला यावेळी मोर्चात आदिवासी महीलांनी डोक्यावर रीकामी हंडे घेऊन थेट तहसील कार्यालयात निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या.आदिवासी एकजूट संघटनेच्या शिष्टमंडळ याने नायब तहसीलदारांशी सकारात्मक चर्चा केली. मोर्चात संघटनेचे सस्थांपक/ अध्यक्ष कु शेरू वाघ उपाध्याक्ष सौ.जयश्री मडवी सदस्य सौ.कमल भूयाळ सौ काजल वरठा श्रीमती.गीता राठोर श्री.जयेश कदम श्री.आकाश लढें (पाटील)कु.रवी दिवा आदिवासी एकजूट संघटनेचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.