
मिठालाल आणि भारत ट्रस्टच्या वतीने मीरा भाईंदर मधील संस्कृतीचे जतन व पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न या उद्देशाने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी जी .सि. एस.हॉल मध्ये पार पडला .मीरा भाईंदर शहरात प्रथमता गनाधीश या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .स्पर्धेमध्ये 103 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच 355 घरगुती गणेश स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता .विजेत्या स्पर्धकांना बक्षीस आमदार गीता जैन यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्याकाळात ट्रस्टच्या वतीने अशा स्पर्धाचे आयोजन व समाजउपयोगी कामे देखील केली जातील असे आश्वासन गीता जैन यांनी दिले . या स्पर्धेचे विशेष बाब म्हणजे लोकांनी थेट मतदान पद्धतीने आपल्या स्पर्धकाला जिकवण्याचे नियोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते .सार्वजनिक स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवसेना गल्ली मित्र मंडळ , घरगुती गणपती संतोष पाटील तर सर्वोत्कृष्ट सजावट म्हणून पेणकरपड्याचा राजा स्पर्धकांना विजेता म्हणून रोख रक्कम व प्रस्तस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गैरविण्यात आले .