( भाग 2)
वसई (पत्रकार):अतुल साळवी
नालासोपारा उड्डान पुला खाली वाहतुक पोलीसांच्या डोळ्या देखत नरसिंग दुबे मैदाना समोर अनधिकृत रिक्शा तळ चालु झाल्यामुळे आचोळे गावा कडुन स्टेशनला येणारा रस्ता रोखला जातो.
येथे उभ्या असलेल्या रिक्शा या संतोष भुवन, गावराई पाडा या दिशेने जातात. पण त्यामुळे आचोळे रोड वरून सेंट्रल पार्क च्या दिशेने जाणार्‍या वाहतुक वर परिणाम होतो.
जी गत स्टेशन परिसराची तिच गत संतोष भुवनची.
येथे असलेला रिक्शा तळ विरूध्द दिशेला असल्यामुळे येथे १२ महिने २४ तास वाहतुक व्यवस्था कोलमडली असते. त्यात भर पडते ती हायवे वरून येणार्‍या रिक्शांची . संतोष भुवन ते गवराई पाडा नाका या परिसरात सकाळ संध्याकाळ वाहतुक कोंडी होते त्याचे सारे श्रेय येथे असलेल्या अनधिकृत रिक्शा तळाला जाते.
नालासोपारा हायवे ते नालासोपारा स्टेशन हा केवळ ७ कि.मी. चा रस्ता कापण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागतो याला प्रमुख कारण विरूध्द दिशेस असलेले रिक्शा तळ. वेळ, इंधन यांचा अपव्यय तसेच नागरिकांना होणारा मानसिक त्रास यापासून सुटका होण्यासाठी
वाहतुक पोलीस , स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed