
प्रतिनिधी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्याल वसई येथे संगीत प्रतियोगीता स्पर्धा (वसई आयडॉल) दि.१८ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धेत वसई तालुक्यातील अनेक महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी भाग घेतला बुधवारच्या सायंकाळी सूंदर-मधुर संगीत आवाजाने गायकांनी श्रोत्यांचे मन जिकली एकाहून एक स्पर्धेकानी आपल्या आवाजाची जादू दाखवली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते वसई विरार शहर महानगरपालिकाचे महापौर प्रवीण शेट्टी व समीर फातर्फेकर (मुजिक कम्पोजर) त्याचप्रमाणे मा.जजस् होते डॉ. गणेश चंदनशिव, राजेश प्रभू, बेला ग्रेसेस, सेवान डिसोजा उपस्थित होते. माननीय मान्यवर संदेश जाधव, राजाराम मुळीक, आनंद अहिरे, इश्वर धुळे, प्रा.अमित माथूर, प्रा. कोन्सीको डीसोजा, प्रा.सिद्धी वर्तक, प्रा.लोकेश गुप्ता असे अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पधेचा पहिला मान पटकवला सयैद रेहांत यानी २) एडन कुरियन ३) नीरज सोनार , ४)अमिषा बैलोट, ५) हमीद शेख, ६)श्रद्धा चौधरी सर्व स्पर्धकांना मान चिन्ह व रोख रक्कम देण्यात आली. संगीत स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. आलेल्या सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे यांचे आभार संस्थेचे संस्थापक डॉ. विनोद गायकवाड व उपाप्रचार्य एस.एम.शेख यांनी आभार मानले. सदर महाविद्यालयाचे शिक्षक, विध्यार्थी, संपुर्ण कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यास मोलाचे योगदान दिले.