

अॅक्युप्रेशर उपचार पद्धती काळाची गरज
प्रतिनिधी, वसई :
मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात रुग्ण लवकर लवकर आजार ठीक होण्यासाठी ऑलोपॅथिक उपचार पद्धती घेत असतात. परंतु या उपचार पद्धतीने आजार मुळापासुन ठीक न होता त्याचा त्रास भविष्यात सतत जाणवत राहतो. यासाठीच आता आजार मुळापासुन ठीक करणार्या अॅक्युप्रेशर या उपचार पद्धतीचे महत्त्व नागरिकांना समजु लागले आहे.
परंतु ह्या उपचार पद्धतीची माहिती नसल्याने रुग्ण नाईलाजास्तव ऑलोपॅथिक उपचार घेतात. यासाठी वसई येथे अत्याधुनिक राऊत अॅक्युप्रेशर अॅण्ड अलर्ट मेडिसिन क्लिनिक नुकतेच सुरु झाले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन हर्ष प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जाधव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी स्वप्नील, करुणा भानुशाली, पो.सुनील भागिरथी, डॉ. जयंती चोपडा, एसएससी ग्रुप (1994-95) व राऊत कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी राऊत अॅक्युप्रेशर क्लिनिकचे संस्थापक डॉ. महेंद्र राऊत (उर्फ मयुर राऊत) यांनी या उपचार पद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, या अॅक्युप्रेशर थेरपिच्या साहाय्याने मणक्यातील, कंबरेतील गॅप, किडनी स्टोन, थायरॉईड, पित्ताशयातील खडे आदी रोगांवर विना ऑपरेशन उपचार केले जाणार आहेत.