वसई (प्रतिनिधी) वसई तालुक्यात फार्म हाऊस हॉटेल साखळीत आणखी एका अलिशान हॉटेलची वाढ झाली आहे.वसई पूर्व भागात औद्योगिक वसाहती आहेत. आणि अनेक लहान थोर उद्योजक,अधिकारी,व्यापाऱ्यांची सतत वर्दळ असते.प्रामुख्याने रेंज नाका ते महामार्ग
या दरम्यान एका चांगल्या हॉटेल ची गरज होती.
या संधीचा लाभ घेत हॉटेल मॅनेजमेंट आणि स्टैडर्ड मेंटेनिंग मधे नामवंत असणाऱ्या “फार्म हाऊस” हॉटेल मालकांनी सातिवली नाका, सभापती रमेश घोरकाना यांच्या कार्यालयासमोरील मोटर्स शो रुम इमारतीच्या छपरावर(टैरेस)गेल्या रविवारी समारंभ पूर्वक नवे हॉटेल सुरू केले आहे.भरपूर जागा आणि एखाद्या गार्डन सारखी मांडणी आणि ऐसपैस टेबल व खुर्च्या.
आणि कर्मचाऱ्यांचा ताफा यामुळे या हॉटेलचे वेगळेपण उठून दिसते.रविवारी,२२ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या उदघाटन सोहळ्यात आम.क्षितीज ठाकूर,आम.राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव,महापालिका प्रभाग समिती सभापती कन्हैया तथा बेटा भोईर, अतुल साळुंखे, माजी सभापती व नगरसेवक रमेश घोरकाना, नगरसेवक मिलिंद घरत,सुनिल आचोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.हॉटेल व्यावसायिक हरिष शेट्टी आणि भरत शेट्टी यांनी या मान्यवरांचे स्वागत केले.हॉटेल आणि अन्य क्षेत्रातील उद्योजक, अधिकारी आणि अनेक दाक्षिणात्य परिवार या सोहळ्यात सहभागी झाले होते.
विशाल जैस्वाल या गायक व गिटारिस्ट कलावंताने उपस्थितांचेमनोरंजन केले.तर हरिष शेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *