

नालासोपाऱा ता.२५ (प्र.) पूर्व भागातील तुळिंज साईनाथ नगर या वसाहतीत सध्या छोट्या मुलां मुलींना व महिलांना स्वसंरक्षण आणि फिजिकल फिटनेस या विषयी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन केले जात आहे.मार्शल आर्टिस्ट रमेश क्रिष्णन आणि शब्बीर टिनवाला हे या छोट्या मोठ्यांना फिटनेस विषयी प्राथमिक धडे देत आहेत.मांडी घालून नीट बसणे, ध्यान करणे, श्वास रोखून धरणे आणि हळुवार सोडणे. हलक्या स्वरूपाचा व्यायाम करणे.आणि शिस्तीचे पालन करणे अशा प्रकारच्या या प्रशिक्षणाची सोय येथील साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगळी व्यवस्था येथील रहिवासींनी केली आहे.संध्याकाळी साईमंदिराजवळ
छोट्यांचा वर्ग भरतो. दररोज किमान ५० मुले आणि ३० महिला या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत आहेत.
सेल्फ डिफेन्स आणि शारीरिक सक्षमता या विषयी यांच्यात जागरुकता निर्माण करणे, या विषयी गोडी निर्माण करणे आणि एकप्रकारचे वळण लावणे हा आपला हेतू असून कुणाकडूनही फी घेतली जात नाही. असे या उपक्रमाबाबत प्रशिक्षक क्रिष्णन यांनी सांगितले.