
१९९५ ला नालासोपारा नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. आम.हितेंद्र ठाकूर यांनी स्थापन केलेल्या वसई विकास मंडळाने ती जिंकली.
आचोळ्याचे माजी सरपंच जयराम पाटील यांना पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. .
पुढे स्व.नाना पाटील, स्व.शकुंतला पाटील, उमेश नाईक, राजेश रोडे,अब्दुलमोईद घन्सार यांनी हे पद सांभाळले.
बरखास्त झालेल्या ग्रामपंचायती निळेमोरे, सोपारा, तुळिंज आणि आचोळे ही गावं आणि तेथील नेत्यांना शहराचे नेतृत्व करण्यात संधी मिळाली.
या दरम्यान शहर पूर्व भागात वेगाने फोफावले.बरेचसे प्रश्न गंभीर होत गेले.संपूर्ण वसई तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या आम.हितेंद्र ठाकूर यांनी अथक परिश्रम घेत आधी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाती घेतला.
केवळ पेल्हार या बंधाऱ्याच्या आधारे तालुक्याला पाणी पुरवठा अत्यंत मर्यादित प्रमाणात होत होता. आमदारांनी ३२ कोटींची उसगाव योजना आणली. पुरवठा काही प्रमाणात वाढला.उसगाव योजनेबरोबरच आमदारांनी सूर्या प्रकल्पातून पाणी आपल्या भागाला आणण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.तोवर नालासोपाऱा शहर एवढे मोठे झाले की या शहराच्या पायाभूत गरजा भागविण्यासाठी
नगरपालिका तोकडी पडू लागली.आणि महानगरपालिकाच पर्याय ठरल्याने शासनाने २००९
ला महापालिका दिली.आम.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी हा नवा पक्ष स्थापन करून नवा इतिहास रचला. केवळ महापालिका जिंकली असे नाही तर विक्रमी यश प्राप्त केले.
तालुक्याबाहेर पडत नव्या पालघर जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला.पक्षाला खासदारकी मिळवून देत
राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व बळीराम जाधव यांच्या रुपाने दिले. नव्या पिढीचे उमदे नेतृत्व उदयास आले.
क्षितीज ठाकूर आणि विलास तरे आणि सध्याचे राजेश पाटील असे कार्यकर्ते आमदार झाले.
१९८८ ला तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले
आमदार हितेंद्र ठाकूर वीस वर्षांत पालघर जिल्ह्यातील प्रमुख नेतेच काय “लोकनेते”झाले.
आता याच ओघाने एक जुनाच मुद्दा पुढे येत आहे.
आपल्या महापालिकेच्या नावाचा. नालासोपाऱा या प्रमुख शहराचे नाव सध्याच्या नावात का नाही ? हे नाव न वगळता सुद्धा या महापालिकेचे नामकरण झाले असते.
उदाहरणार्थ “वसई- विरार-नालासोपाऱा महानगरपालिका”आता कुणी म्हणेल नवघर माणिकपूरचे काय? तर त्यावर एक उत्तर दिले जाते.
वसई म्हणजेच वसई रोड आणि वसई गाव, मधल्या माणिकपूर सह. नालासोपाऱा म्हणजे विरार आणि वसईला जोडणारे शहर.दुर्लक्ष म्हणावे की अन्याय ?
महापालिका आणि नवा पालघर जिल्हा आल्यानंतर नालासोपाऱा शहराकडे शासनाने म्हणावे तसे लक्ष दिले नाही.गेल्या निवडणूकीचा भाग म्हणून को ऑप मेंबर निवडणूकीत नालासोपाऱा शहरातून एकही नाही.
अनेक नव्या जिल्हा समित्या स्थापन करण्यात आल्या.
कला आणि क्रीडा विषयक समित्यांमधे नालासोपाऱा फारसे दिसत नाही.
याचे नेमके कारण शोधून या बाबत नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महापालिकेचा नामविस्तार व्हावा यासाठी ते आवश्यक ते प्रयत्न करतील. आणि भविष्यात हे असे झाले तर या शहरातील नागरिक आनंदी होतील.अशी या नामविस्ताराच्या बाबत शहरात चर्चा आहे.