मुंबई 24 डिसेंबर :धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश नाही
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता निश्चत झालाय. तब्बल महिनाभरानंतर म्हणजे 30 डिसेंबरला हा विस्तार होणार असून त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सगळ्याच आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा लागली होती. विधिमंडळाच्या प्रांगणात भव्य प्रमाणात हा शपथविधी होणार आहे. 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी प्रत्येक पक्षांच्या दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सगळ्यांचं लक्षं लागलं होतं ते अजित पवारांच्या समावेशाकडे. अजित पवारांचा समावेश होणार हे आता नक्की असून त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का याची सगळ्यांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे नेत धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही अशी शक्यता आहे. त्यांचा पत्ता कट होण्याचीच शक्यता असून त्यांना राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरे ठाकरे यांचाही मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता नाही असंही सांगितलं जातंय.

अशी आहेत तीनही पक्षांची संभाव्य नावे

१) के सी पाढवी, काँग्रेस
२) अमित जनक, काँग्रेस

३) यशोमती ठाकूर, काँग्रेस
४) अशोक चव्हाण, काँग्रेस
५) अमीन पटेल, काँग्रेस
६) अमित देशमुख, कोंग्रेस
७) प्रणिती शिंदे, काँग्रेस
८) पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
९) सतेज पाटील, काँग्रेस
१०) विश्वजीत कदम, काँग्रेस
11) जोगेंद्र कवाडे मित्रपक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस
१) अजित पवार, राष्ट्रवादी
२) अनिल गोटे, राष्ट्रवादी
३) धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी
४) राजेश टोपे, राष्ट्रवादी
५) नवाब मल्लिक, राष्ट्रवादी
६) अदिती तटकरे, राष्ट्रवादी
७) संग्राम जगताप, राष्ट्रवादी
८) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
९) अनिल देशमुख, राष्ट्रवादी
१०) इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी
11) राजू शेट्टी/जयंत पाटील(शेकाप)
शिवसेना
१) गुलाबराव पाटील, शिवसेना
२) दादा भुसे, शिवसेना
३) संजय रायमूलकर, शिवसेना
४) बचू कडू (प्रहार), शिवसेना
५) राहुल पाटील, शिवसेना
६) प्रदीप जेसवाल,संजय शिरसाट
७) श्रीनिवास वनगा, शिवसेना
८) रवींद्र वाईकर/ सुनील राऊत, शिवसेना
९) तानाजी सावंत, शिवसेना
१०) शंभूराजे देसाई, शिवसेना
११) भास्कर जाधव, शिवसेना
१२) दीपक केसरकर, शिवसेना
१३) प्रकाश अबीटकर, शिवसेना
१४) आशिष जयस्वाल, शिवसेना
१५) संजय राठोड, शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *