वसई (प्रतिनिधी :- स्नेहा जावळे ) मुस्लिम समाजातुन आंबेडकरी विचाराने प्रभावित होवुन अनेक मुस्लिम युवक रिपाई गवई गट मध्ये समाविष्ठ होत आहेत . शफिकुर रेहमान उर्फ सन्ने युवाशक्ती फाऊंडेशन वसई तालुका कार्यध्यक्ष म्हणून वसई तालुका मध्ये समाजिक कार्यात खुप सक्रिय आहेत .
शफिकुर यांच्या कामाची सुरुवात अतिशय कमी वयात ” यंग इंडियन सोशल ग्रुप ” यांच्या सोबत झालेली या ग्रुपच्या माध्यमाकुन त्यांनी युवाकांसाठी काही काम केले त्यात आवर्जुन उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे युवकांसाठी ड्रग्ज विरोधी रैली तुन व नाटका मार्फत युवकांना नशा करणे कसे घातक आहे हे समजुन देण्याचा प्रयत्न केला होता . याच बरोबर अति वृष्टीने अडकलेल्या लोकांसाठी वेळेत नास्ता बिस्कीट व पिण्याचे पाण्याची सोय केली .अशी एक ना अनेक सामाजीक काम करुन आता शफिकुर राजकारणाकडे वळले आहेत तेही समाजहितासाठीच .
रिपाई व गवई गट हे म्हणजे संपुर्ण डाॅ. आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आहेत ” जगा आणि जगुद्या ” शिका आणि संघटीत व्हा संघर्ष करा . मुळात सर्वांनी शिकले पाहीजे तसेच भारतिय संविधानाची माहीती व लोकांनला त्याचे मुलभुत हक्क यावर जन जागृती करणे यातुन समाजाला शक्य तितकी मदत करणे अशा आशावादी व तत्वांनामुळे आणि डाॅ. आंबेडकरांच्या विचाराणे एकत्र येवुन गवई गट काम करत असतो .
डॉ.राजेंद्र गवई हे नाव म्हणजे केवळ आंबेडकरी विचारधारेवर चालणारे व स्वतंत्र पक्ष व निशाणीवर निवडणुक लढणारे मा. प्रकाश आंबेडकर मा. डॉ राजेंद्र  गवई आहेत .गवईजीनी दोन वेळा काॅंग्रेसच्या विरोधी ही निवडणुक लढली आहे . राष्ट्रीय नेते गवईजी पण CAA व NCA विरोधी मतांचे आहेत कारण या नागरिकत्व सुधार कायद्याअंतर्गत केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर अनुसुचित जाती-जमातीचाही समाज भरडला जाणार आहे .कारण या नागरिकत्व सुधार कायद्यानुसार १९५० पासुनचे जातीच्या दाखल्याचे पुरावे मागितले जात आहेत . जे आता शक्य नाहीये . जर तुमचे वडीलच १९५० नंतर जन्म असेल तर त्यापुर्वीचे कागदपत्र आणायचे कुठुन ? केवळ कागदपत्र मिळत नसल्याने आमचे नागरिकत्व नाकारले जाणार का ? असे अनेक प्रश्न धेवुन व आंबेडकरी विचारांनी प्रभावित होवुन सध्या युवकांचे या रिपाई व गवई गट मध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणात वाढला आहे .
शफिकुर रहमान यांची पालघर जिल्हा रिपाइं युवक अध्यक्ष पदि निवड दिनांक 25 डिसेंम्बर 2019 रोजी पक्ष कार्यालयात रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते मा. डॉ. राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार आज शफिकुर रहमान यांची पालघर जिल्हा रिपाइं युवक अध्यक्ष पदि निवड करण्यात आली तर चंदन उमेश सिंह यांचि रिपाइं युवक अध्यक्ष वसई विरार शहर मह‍ानगरक्षेत्रपदि मा.राजेंद्र गवई साहेबांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळि उपस्थित पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी , मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद खरात साहेब व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शफिकुर यांच्या समाजकार्य ते राजकारण या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *