‎वसई (प्रतिनिधी एस.रहमान) दिनांक 25 डिसें19 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास रानगाव हनुमान आळी ता.वसई जि. पालघर येथे आरोपीत नामे जगनाथ घरत रा.रानगाव हनुमान आळी ता. वसई जि. पालघर याने आपल्या रहत्या घराच्या मागील शेतात विनापरवाना प्रॉव्हिबिशन गुन्हाच्या माल आपले कब्जात बाळगत असताना पोलिसांची चाहूल लागताच झाडा झुडपाच्या व अंधाराचा फायदा घेत पळून गेला. आरोपीत याचे ताब्यातून 1)९०,०००/- रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.म्हणून आरोपीत याचे विरुद्ध वसई पोलीस ठाणे गु.र.नं. २३०/२०१९ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ ६५फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. भास्कर पुकळे,प्रभारी अधिकारी वसई पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली वसई पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *